माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज ॲनिमेशन फिल्ममेकर्स चॅलेंज - 42 उत्तमोत्तम ॲनिमेशनपटांची मेजवानी
ॲनिमेशन पट : 18 लघुपट, 12 फिचर फिल्म्स, 9 टीव्ही मालिका आणि 3 एआर/व्हीआर प्रकल्प यांचा वेव्हज शिखर परिषदेत समावेश
Posted On:
28 APR 2025 4:50PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 28 एप्रिल 2025
वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद 2025 मध्ये 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन -1' चा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ॲनिमेशन फिल्म मेकर्सस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या 42 स्पर्धकांची नावे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील या चॅलेंजसाठी प्रारंभापासूनच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाबरोबर सहयोग करणाऱ्या डान्सिंग अटॉम्स स्टुडिओने वेव्हज शिखर परिषदेत दाखवण्यात येणाऱ्या स्पर्धेतील सर्वोत्तम 42 पटांचा कॅटलॉग तयार केला आहे. मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत वेव्हज शिखर परिषद होणार आहे. या अनोख्या उपक्रमाचे उद्दिष्ट प्रतिभावान निर्मात्यांना समविचारी सर्जनशील व्यक्ती, निर्माते आणि वितरकांशी जोडणे, निर्माते आणि उद्योग यांच्यातील भौगोलिक सीमा ओलांडून सहयोगाला चालना देणे, हे आहे.
स्पर्धेच्या नऊ महिन्यांच्या कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर निवड करण्यात आलेल्या या सर्वोत्तम 42 प्रकल्पांमध्ये पारंपरिक ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर)/व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि व्हर्च्युअल निर्मिती असा ॲनिमेशन क्षेत्राचा व्यापक समावेश असलेल्या या स्पर्धा प्रकारात मूळ कथाकथनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. क्रिएटिव्ह कॅटलॉगमध्ये विविध नवोपक्रमांचा समावेश आहे. यामध्ये 12 फीचर फिल्म, 18 लघुपट, टीव्ही मालिका: 9 टीव्ही/लिमिटेड सीरिज आणि 3 एआर/व्हीआर अनुभव यांचा समावेश आहे. या अनोख्या उपक्रमाद्वारे निवड झालेले सर्व 42 ॲनिमेशनपट प्रकल्प उद्योगातील भागधारकांना दाखवले जातील.
निवड झालेल्या 18 लघु ॲनिमेशनपट निर्मात्यांची आणि त्यांच्या प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे:
1) श्रेया सचदेव - वाणी
2) श्रीकांत एस मेनन - ओडियान
3) प्रशांत कुमार नागदासी - बेस्ट फ्रेंड्स
4) श्वेता सुभाष मराठे - मेल्टिंग शेम
5) अनिका राजेश - अचप्पम
6) मार्तंड आनंद उगलमुगळे - चांदोमामा
7) किरुथिका रामसुब्रमण्यन - अ ड्रीम्स ड्रीम
8) हरीश नारायण अय्यर - कराबी
9) त्रिपर्णा मैती - द चेअर
10) अरुंधती सरकार - सो क्लोज यट सो फार
11) गडम जगदीश प्रसाद यादव - सिम्फनी ऑफ डार्कनेस
12) वैत्रिवेल - द लास्ट ट्रेजर
13) गार्गी गवते - गोडवा
14) श्रेया विनायक पोरे - कळी
15) हर्षिता दास - लुना
16) संद्रा मेरी - मिसिंग
17) रिचा भुतानी - क्लायमेटस्केप
18) हिरक ज्योती नाथ - टेल्स फ्रॉम द टी हाऊस
निवड झालेले 12 ॲनिमेशन फिचर फिल्म्स क्रिएटर्स आणि त्यांची नावे:
1) कॅथरीना डियान वीरस्वती एस - फ्लाय!
2) शुभम तोमर - महझुन
3) श्रीकांत भोगी - रुद्र
4) अनिर्बान मजुमदार- बाबर और बन्नो - अ फ्रेंडशिप सागा
5) नंदन बालकृष्णन - द ड्रीम बलून
6) जॅकलिन सी चिंग - लाइके अँड द ट्रोल्स
7) रोहित सांखला - द्वारका द लॉस्ट सिटी ऑफ श्री कृष्णा
8) भगतसिंग सैनी - रेड वुमन
9) अभिजीत सक्सेना - अराइज, अवेक
10) वामसी बंडारू - आयुर्वेद क्रॉनिकल्स - सर्च फॉर द लॉस्ट लाईट
11) पीयूष कुमार - राँग प्रोग्रामिंग..द अनलीश्ड वॉर्स ऑफ एआय.
12) खांबोर बतेई खरजाना - लपलांग - एक खासी लोककथा पुनर्कल्पित
चाळणी प्रक्रियेतून निवडण्यात आलेले 9 ॲनिमेशन टीव्ही/ मर्यादित मालिका निर्माते आणि त्यांची कलाकृती खालीलप्रमाणे आहेत:
1) ज्योती कल्याण सुरा - जॅकी अँड जिलाल
2) तुहिन चंदा - चुप्पी: सायलेन्स बिहाइंड लॉज
3) किशोर कुमार केदारी - एज ऑफ द डेक्कन: द लिजंड ऑफ मलिक अंबर
4) भाग्यश्री सत्पथी –पेसा
5) रिषव मोहंती- खट्टी
6) सुकांकन रॉय- साऊंड ऑफ जॉय
7) अत्रेयी पोद्दार, संगीता पोद्दार आणि बिमल पोद्दार - मोरे काका
8) प्रसेनजीत सिंघा - द क्वाएट केयॉस
9) सेगुन सॅमसन, ओमोतुंडे अकीओडे- मापु
निवड झालेले 3 वर्धित वास्तव (एआर)/आभासी वास्तव (व्हीआर) अनुभव निर्माते आणि त्यांच्या कलाकृती खालीलप्रमाणे आहेत:
1) सुंदर महालिंगम –अश्वमेध – द अनसील्ड फेट
2) अनुज कुमार चौधरी –लिमिनॅलीझम
3) इशा चंदना - टॉक्सिक इफेक्ट ऑफ सबस्टन्स ऑन ह्युमन बॉडी
पहिल्यांदाच सर्व 42 प्रकारचे प्रकल्प एकाच सर्जक संग्रहात एकत्र आणणे हा आपल्याला गवसलेल्या निखळ प्रतिभेचा पुरावाच आहे असे उद्गार डान्सिंग अटॉम्स स्टुडीओजच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सरस्वती बुय्याला यांनी काढले. देशातील माध्यमे तसेच मनोरंजन उद्योगातील सन्माननीय ज्येष्ठ व्यक्ती आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असलेले वेव्हज सल्लागार मंडळ या प्रकल्पांच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्यात आणि निर्मात्यांना निर्मिती तसेच वितरण यांच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल असे त्या पुढे म्हणाल्या. या चैतन्यपूर्ण कलाकृतींमधून जागतिक पातळीवर निर्माण झालेला महसूल, ॲनिमेशन उद्योगामध्ये असलेली प्रचंड क्षमता अधोरेखित करतो अशी माहिती देखील बुय्याला यांनी यावेळी दिली. वर्ष 2024 मध्ये जागतिक ॲनिमेशन बाजारपेठेने लक्षणीय वृद्धी नोंदवली. ऑनलाईन प्रसारण तसेच विविध महोत्सवांसह इतर अनेक मंचाच्या माध्यमातून लघुपटांनी महसुलात 20 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे तर शैक्षणिक सामग्रीचे योगदान वर्ष 2032 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेईल असा अंदाज आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फिचर फिल्म्स निर्मिती उद्योगाने जागतिक पातळीवरील बॉक्स ऑफिस तसेच सहाय्यक बाजारपेठांमधून अंदाजे 30 अब्ज डॉलर्स ते 32.3 अब्ज डॉलर्स इतका महसूल मिळवून दिला आहे.
विविध प्रकारच्या प्रसारण सेवांमुळे चालना मिळून ॲनिमेशन टीव्ही मालिकांना फार चांगले दिवस आले असून त्यांनी उत्पादन तसेच परवाना महसूल यांच्या माध्यमातून सुमारे 512 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे. एआर/व्हीआर ॲनिमेशन क्षेत्रासह एआर/व्हीआर तसेच गुंगवून टाकणाऱ्या मनोरंजनाची बाजारपेठ हे आता सतत वाढत जाणारे क्षेत्र झाले आहे. लक्षणीय वृद्धीच्या आलेखासह हा बाजार 22.12 अब्ज डॉलर्स आणि 79.36 अब्ज डॉलर्सच्या अंदाजित पातळीपर्यंत पोहोचला आहे. गेमिंग, आरोग्यसेवा, किरकोळ विक्री, शिक्षण तसेच उत्पादन या क्षेत्रासंह इतर अनेक क्षेत्रांमध्ये एआर/व्हीआर तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणण्यासह 3d उत्तम अनुभवाची मागणी आणि भरीव गुंतवणुकीची त्याला जोड लाभली आहे. यामध्ये उत्तर अमेरिकेचा वाटा लक्षणीय असला तरी हिंद प्रशांत क्षेत्र सर्वाधिक वेगाने विकास करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.
वेव्हज 2025 ॲनिमेशन फिल्ममेकर्स चॅलेंज विषयी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया लिंकचा वापर करा
ॲनिमेशन फिल्ममेकर्स चॅलेंजच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या 42 स्पर्धकांची यादी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
PIB Mumbai | N.Chitale/Sonali/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2124861)
| Visitor Counter:
20
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam