माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज बझारने आपल्या पहिल्या 'टॉप सिलेक्टस ' लाइनअपचे केले अनावरण , 9 भाषांमधील 15 प्रकल्पांचा समावेश
Posted On:
25 APR 2025 4:10PM
|
Location:
PIB Mumbai
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताचा दबदबा आहे, जिथे देशाच्या विविध भौगोलिक भागातले प्रतिभावंत आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातून आकर्षक आशय सामग्री तयार करतात. मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान होणारी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाचे व्यासपीठ बनण्यास सज्ज आहे. ही शिखर परिषद भारताला आशय निर्मिती, गुंतवणूक गंतव्यस्थान आणि 'भारतात निर्मिती ' ची संधी तसेच जागतिक पोहोच यासाठी वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून प्रोत्साहन देईल.
वेव्हज बझार ही माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी एक प्रमुख जागतिक बाजारपेठ आहे, संपर्क , सहकार्य आणि वाढीला चालना देण्यासाठी खास तयार केलेले एक गतिमान व्यासपीठ आहे . हे चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदार, विक्रेते आणि विविध प्रकल्प तसेच प्रोफाईल्सशी संवाद साधण्याची संधी देते, तसेच त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची आणि त्यांचे व्यावसायिक संबंध विस्तारण्याची संधीही देते.
व्ह्यूइंग रूम हा 1 ते 4 मे , 2025 दरम्यान वेव्हज बझार मध्ये स्थापित एक समर्पित भौतिक मंच आहे. जगभरातील नुकतेच पूर्ण झालेले चित्रपट आणि पोस्ट प्रॉडक्शनमधील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठीचे एक ठिकाण आहे. चित्रपट महोत्सव, जागतिक विक्री, वितरण भागीदारी आणि फिनिशिंग फंडसाठी हे चित्रपट सक्रियपणे संधी शोधत आहेत.
फिल्म प्रोग्रामर, वितरक, जागतिक विक्री एजंट, गुंतवणूकदार आणि इतर उद्योग व्यावसायिकांसाठी तयार केलेली व्ह्यूइंग रूम एक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देते जिथे वेव्हज बझारला उपस्थित राहणारे प्रतिनिधी हे चित्रपट पाहू शकतात, तपशीलवार प्रकल्प माहिती मिळवू शकतात आणि आमच्या विशेष व्ह्यूइंग रूम सॉफ्टवेअरद्वारे चित्रपट निर्मात्यांशी थेट संपर्क साधू शकतात.
पहिल्याच वेव्हज बझारसाठी, भारत, श्रीलंका, अमेरिका , स्वित्झर्लंड, बल्गेरिया, जर्मनी, मॉरिशस आणि यूएई या 8 देशांमधील एकूण 100 चित्रपट व्ह्यूइंग रूम लायब्ररीमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध असतील. एकूण श्रेणीमध्ये एनएफडीसीद्वारा निर्मित आणि सह-निर्मित 18 चित्रपट आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) मधील 8 पुनर्संचयित चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय, पुणे) आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय, कोलकाता) मधील 19 विद्यार्थी प्रकल्पांचा देखील समावेश आहे.
व्ह्यूइंग रूममधून वेव्हज बझार टॉप सिलेक्टस विभागासाठी निवड झालेल्या या 15 प्रोजेक्ट्समध्ये 9 कथा-आधारित चित्रपट, 2 माहितीपट , 2 लघुपट आणि 2 वेब-सिरीजचा समावेश आहे जे 2 मे 2025 रोजी जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे वेव्हज बझार दरम्यान ओपन पिचिंग सत्रात निर्माते, विक्री एजंट, वितरक, फेस्टिवल प्रोग्रामर आणि संभाव्य गुंतवणूकदारांसमोर त्यांचे चित्रपट सादर करतील.
वेव्हज बाजार टॉप सिलेक्टस 2025
1. द वेज कलेक्टर | तमिळ | भारत | फिक्शन फीचर
दिग्दर्शक - इन्फन्ट सूसाई | निर्माता - बगवती पेरुमल
2. पुतुल | हिंदी | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - राधेश्याम पिपलवा | निर्माता - शरद मित्तल
3. दूसरा ब्याह (लेविर) | हरियाणी , हिंदी | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - भगतसिंग सैनी | निर्माती - परवीन सैनी
4. पंखुडिया (पेटल्स इन द विंड ) | हिंदी | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - अब्दुल अझीझ | निर्माता - अब्दुल अजीज, ज्योत्सना राजपुरोहित
5. खिडकी गाव (इफ ऑन अ विंटर्स नाईट ) | मल्याळम | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - संजू सुरेंद्रन | निर्माता - डॉ. सुरेंद्रन एम एन
6. सुचना - द बिगिनिंग | बंगाली | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - पौसाली सेनगुप्ता | निर्माता - अविनांदा सेनगुप्ता
7. स्वाहा इन द नेम ऑफ फायर | मगही | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - अभिलाष शर्मा | निर्माता - विकास शर्मा
8. गोटीपुआ - बियाँड बॉर्डर्स | इंग्रजी, हिंदी, ओडिया | भारत | माहितीपट
दिग्दर्शक आणि निर्माता - चिंतन पारेख
9. फ्रॉम इंडिया | इंग्रजी | अमेरिका | माहितीपट
दिग्दर्शक आणि निर्माता - मंदार आपटे
10. थर्ड फ्लोर | हिंदी | भारत | लघुपट
दिग्दर्शक - अमनदीप सिंग | निर्माता - अमनदीप सिंग
11. जहाँ | हिंदी | भारत | फिक्शन शॉर्ट
दिग्दर्शक आणि निर्माता - राहुल शेट्टी
12.प्लॅनेट इंडिया | इंग्रजी, हिंदी | भारत | टीव्ही शो
दिग्दर्शक - कॉलिन बटफिल्ड | निर्माता - तमसील हुसेन
13. भारती और बिबो | हिंदी | भारत | अॅनिमेशन वेब-सिरीज/टीव्ही
दिग्दर्शक - स्नेहा रविशंकर | निर्माता - राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि पपेटिका मीडिया प्रायव्हेट लिमिटेड
14.अचप्पाज अल्बम (ग्राम्पाज अल्बम) | मल्याळम | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक - दीप्ती पिल्लई शिवन | निर्माता - राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ
15. दुनिया ना माने (द अनएक्सपेक्टेड) | हिंदी | भारत | फिक्शन चित्रपट
दिग्दर्शक आणि निर्माता - व्ही. शांताराम
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
***
PIB TEAM WAVES 2025 |N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Release ID:
(Release ID: 2124361)
| Visitor Counter:
22