माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रादेशिक मूळांपासून राष्ट्रीय प्रकाशझोतापर्यंत
वॅम! वेव्हज 2025 मध्ये भारताच्या सर्वोत्तम सर्जकांना पुरस्काराने गौरवण्यात येणार
Posted On:
21 APR 2025 8:30PM
|
Location: PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2025
अनेक महिन्यांच्या प्रादेशिक स्पर्धा आणि हजारो प्रवेशिकांनंतर भारतभरातील 11 शहरातून वेव्हज ऍनिमे आणि मांगा अर्थात वॅम या राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.1 ते 4 मे दरम्यान मुंबईत जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित होणार असलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या माध्यम आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्हज 2025 मध्ये ही प्रतिष्ठेची स्पर्धा होणार आहे.

वेव्हज अर्थात जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचा एक भाग म्हणून भारतीय माध्यम आणि मनोरंजन संस्थेने (MEAI) वॅम! या स्पर्धेचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पाठबळाने आयोजन केले आहे. ऍनिमेशन, एव्हीजीसी- XR क्षेत्र-ऍनिमेशन, व्हिज्युएल इफेक्ट्स, कॉमिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), गेमिंग आणि एक्सटेन्डेड रियालिटीसाठी वेव्हज हा भारताचा सर्वात मोठा मंच आहे. वेव्हजच्या केंद्रस्थानी क्रिएट इन इंडिया (सीआयसी) चॅलेंज आहे. या चॅलेंजच्या पहिल्या हंगामात 1100 आंतरराष्ट्रीय सहभागींसह सुमारे 1 लाख नोंदणीद्वारे इतिहास घडला. अतिशय बारकाईने केलेल्या निवड प्रक्रियेद्वारे 750 हून अधिक अंतिम स्पर्धकांची 32 वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे.
सीआयसी अंतर्गत वॅम हा सर्वस्वी वेगळ्या विभागांपैकी एक आहे. गेल्या एका दशकात भारतात ऍनिमे आणि मांगा यांचा झपाट्याने विकास झाला आहे. एक हौशी प्रकार म्हणून ज्याची सुरुवात झाली त्याचे रुपांतर आता एका सांस्कृतिक लाटेत झाले आहे.भारतांमध्ये सुमारे 18 कोटी ऍनिमे चाहते आहेत, ज्यामुळे चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऍनिमे बाजारपेठ बनला आहे. केवळ चाहत्यांच्या संख्येतच नव्हे तर उलाढालीच्या आकडेवारीतही वृद्धी झाली आहे. 2023 मध्ये भारताची ऍनिमे बाजारपेठ 1,642.5 दशलक्ष डॉलरची होती. 2032 पर्यंत तिचे मूल्य 5036 दशलक्ष डॉलर होण्याची अपेक्षा आहे.

या वाढत्या सर्जनशील ऊर्जेला वॅमद्वारे वाव मिळणार आहे. भारतीय सर्जकांसाठी आपली स्वतःच्या बौद्धिक संपदेचे वर्धन आणि प्रदर्शन करण्यासाठी ही स्पर्धा संरचित संधी उपलब्ध करून देत आहे. अस्सल, सांस्कृतिकी पाळेमुळे रुजलेल्या बौद्धिक संपदेला प्रोत्साहन देत भारतीय माध्यम उद्योगातील पोकळी भरून काढण्याचे काम ती करत आहे. जागतिक ऍनिमे आणि डिजिटल साक्षरतेमधील वाढीमुळे विद्यार्थी आणि व्यावसायिकांना त्यांच्या संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी वॅम एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आपल्याच मातीमधील बौद्धिक संपदा विकसित करण्याचा एक सुस्पष्ट मार्ग देण्याबरोबरच उद्योगातील मार्गदर्शनाची उपलब्धता आणि सरकारचे पाठबळ देणारा हा उपक्रम आहे.

हा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी मांगा(विद्यार्थी आणि व्यावसायिक), एनीमे (विद्यार्थी आणि व्यावसायिक), वेबटून (विद्यार्थी आणि व्यावसायिक),व्हॉइस ऍक्टिंग आणि कॉस्प्ले अशा विविध विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या श्रेणीतून अतिशय काळजीपूर्वक या सहभागींची निवड करण्यात आली. अगदी तळाच्या स्तरापासून निवडीचा दृष्टीकोन ठेवून गुवाहाची, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी, दिल्ली, मुंबई, नागपूर, अहमदाबाद,हैदराबाद, चेन्नई आणि बंगळूरु या 11 शहरांत स्पर्धा घेण्यात आल्या. ऍनिमेशन, कॉमिक्स, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योगातील तज्ञांचा समावेश असलेल्या परीक्षकांकडून प्रत्येक शहरातील विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या विद्वत्तेमुळे विविध प्रकारच्या ध्वनी आणि कथाकथन परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रतिभावंतांची निवड करता आली. प्रादेशिक फेऱ्यांमध्ये भारताच्या समृद्ध भाषिक आणि कलात्मक विविधता अधोरेखित झाल्या ज्यामुळे सर्जनशील प्रतिभेला कोणत्याही सीमा नसल्याचे सिद्ध झाले.
या भक्कम पायावर आधारित राष्ट्रीय अंतिम फेरी ही केवळ एक लॉन्चपॅड म्हणून मर्यादित राहणार नाही. उद्योगांमध्ये काम करण्याची क्षमता असलेले व्यावसायिक बनण्यासाठी सहभागींना सहाय्य करण्यासाठी, यामध्ये प्रॉडक्शन स्टुडिओजसोबत नेटवर्किंग असलेली लाईव्ह पिचिंग सेशन्स असतील आणि आंतरराष्ट्रीय माध्यम धुरिणांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल.
अंतिम सूचीबद्ध सर्जक आता वॅमसाठी म्हणजेच वेव्हजमधील राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, जिथे ते एका आंतरराष्ट्रीय ज्युरी आणि लाईव्ह कार्यक्रमात प्रेक्षकांच्या उपस्थितीत आपली कला सादर करतील. या अंतिम फेरीत अतिशय उत्कंठावर्धक चुरस पाहायला मिळेल आणि विजेत्यांना मिळणार आहे:
- टोक्योमधील ऍनिमे जपान 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण खर्चासहित सफर
- गुलमोहर मीडियाकडून हिंदी, इंग्रजी आणि जपानीमध्ये ऍनिमे डबिंग
- टूनसुत्राकडून वेबटून पब्लिशिंग
वॅम ! ही केवळ एका स्पर्धा नसून त्यापेक्षाही जास्त काही आहे, भारतातील माध्यमांच्या परिदृश्यातील एक महत्त्वाची पोकळी म्हणजेच भारतीय कथांमध्ये रुजलेल्या जागतिक स्तरावर वाढू शकेल अशा, अस्सल आशयाची तफावत भरून काढण्याचा प्रयत्न करणारी ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. वेव्हज 2025 तोंडावर आलेली असताना, उत्साह वाढू लागला आहे. हा प्रतिभेचा, अस्सलपणाचा आणि कथाकथनाच्या परिवर्तनीय शक्तीचा हा महोत्सव आहे.
संदर्भ
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2123292)
| Visitor Counter:
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada