माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हजसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी 21, 22 आणि 23 एप्रिल रोजी पुन्हा खुली होणार
माध्यम प्रतिनिधींना अर्ज सादर करण्याची आणि नोंदणी करण्याची शेवटची संधी
मुंबई, 20 एप्रिल 2025
माध्यम समुदायाकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES)2025 साठी माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीची मुदत निर्णायक तीन दिवसांकरिता वाढवण्यात आली आहे. उद्या 21 एप्रिल (सोमवार), 22 एप्रिल (मंगळवार) आणि 23 एप्रिल (बुधवार) रोजीही नोंदणी करता येणार आहे. या अंतर्गत माध्यम व्यावसायिक, छायाचित्रकार आणि डिजिटल आशय निर्मात्यांना अर्ज करण्याची तसेच या अत्यंत लोकप्रिय माध्यम आणि करमणुकीच्या (एम अँड इ) उपक्रमात सहभागी होण्याची ही अंतिम संधी आहे. हा उपक्रम 1 ते 4 मे, 2025 दरम्यान मुंबईत होणार आहे. माध्यम प्रतिनिधींचे या संदर्भातील वार्तांकन भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
नोंदणी लिंक : https://app.wavesindia.org/register/media.
जर आपली यापूर्वीची नोंदणीची अंतिम तारखेची संधी हुकली असेल तर यात सहभागी होण्याची ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. विशेष सत्रांमध्ये सहभाग, संपर्क करण्याची संधी आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याला आकार देणाऱ्या उद्योग व्यावसायिकांसोबत समोरासमोर चर्चा करण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होणार आहे.
कोण अर्ज करू शकतात?
- पत्रकार (मुद्रित माध्यमे, दूरचित्रवाणी, नभोवाणी)
- छायाचित्रकार / दृश्यचित्रकार
- मुक्त पत्रकार
- डिजिटल आशय निर्माते
आवश्यक कागदपत्रे:
- सरकारी ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- माध्यम संलग्नतेचा पुरावा
- दहा कार्य नमुने (लिंक किंवा स्क्रीनशॉट)
- व्हिसा (आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी)
नोंदणी खिडकी उघडणार: 21 एप्रिल 2025
बंद होणार: 11:59 PM, 23 एप्रिल 2025
अधिकृत प्रतिनिधींना ईमेलद्वारे सूचित केले जाईल आणि तात्काळ अद्ययावत माहितीकरिता अधिकृत व्हाटसऍप समूहात समाविष्ट केले जाईल.
संपर्क - pibwaves.media[at]gmail[dot]com या ईमेलवर ' व्हेव्हज माध्यम अधिस्वीकृती चौकशी' या विषयाच्या कक्षेत संपर्क करा किंवा आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी करा: 9643034368.
माध्यम प्रतिनिधी नोंदणी धोरणाचा तपशील येथे पहा
‘व्हेव्हज’ वर स्वार होऊन विहार करण्यासाठी तुमची शेवटची संधी चुकवू नका!
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
***
PIB TEAM WAVES 2025 | S.Patil/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com