माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज मधील सर्वोत्कृष्ट 50 डिजिटल पोस्टर विजेत्यांची घोषणा
मुंबईत आयोजित वेव्हज कार्यक्रमात होणार अंतिम पुरस्कार जाहीर
वेव्हज कार्यक्रमात प्रत्यक्ष हँड-पेंटेड पोस्टर मेकिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी 10 जणांची निवड
Posted On:
19 APR 2025 1:00PM
|
Location:
PIB Mumbai
भारतभरातील कलाकारांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेने (वेव्हज) आपल्या फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंजच्या सर्वोत्कृष्ट 50 डिजिटल पोस्टर विजेत्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी उदयोन्मुख व्हिज्युअल कथाकथनकारांची आवड आणि नवोन्मेष प्रतिबिंबित करणाऱ्या 542 डिजिटल प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. हँड-पेंटेड पोस्टर मेकिंग स्पर्धेत, देशभरातील विविध कला संस्थांमधून 10 प्रवेशिका निवडण्यात आल्या आहेत. मुंबईतील वेव्हज शिखर परिषदेत होणाऱ्या लाईव्ह फिनालेमध्ये विजेत्यांची निवड केली जाईल.
डिजिटल पोस्टर मेकिंग स्पर्धा
म्युझिओ कॅमेरा गुरुग्रामचे छायाचित्रकार आणि संस्थापक संचालक आदित्य आर्य आणि दक्षिण दिल्ली महिला तंत्रनिकेतनचे आर्टिस्ट प्रिंटमेकर आणि उपप्राचार्य आनंद मोय बॅनर्जी यांचा समावेश असलेल्या ज्युरीने, इमेजेशन स्ट्रीट आर्ट आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह (NFDC-NFAI) या सह-आयोजकांसह एक कठोर बहु-स्तरीय मूल्यांकन केले. 197 पोस्टर्सच्या प्राथमिक शॉर्टलिस्ट यादीमधून, ज्युरीने सर्जनशीलता, मौलिकता आणि कथाकथनाच्या प्रभावावर आधारित अंतिम टॉप 50 प्रवेशिकांची निवड केली.
सर्वोत्कृष्ट 50 मध्ये, तीन उत्कृष्ट अंतिम स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत (वर्णक्रमानुसार):
- सप्तसिंधु सेनगुप्ता
- शिवांगी सर्मा कश्यप
- सुरेश डी. नायर
सर्वोत्कृष्ट तीनची अंतिम क्रमवारी 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज शिखर परिषदेत जाहीर केली जाईल. स्पर्धेच्या विजेत्या 50 पोस्टर्सचे या शिखर परिषदेत डिजिटल पद्धतीने प्रदर्शन केले जाईल. यामुळे सहभागींना कला प्रदर्शनासाठी आणि ओळखीसाठी एक मौल्यवान व्यासपीठ मिळेल.
वेव्हज मध्ये थेट स्पर्धेद्वारे हस्तनिर्मित पोस्टर कला साजरी केली जाणार आहे.
वेव्हेज शिखर परिषदेत एका प्रत्यक्ष हस्तनिर्मित चित्रपट पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेद्वारे एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीची दृश्य ओळख परिभाषित करणाऱ्या पारंपरिक कला प्रकारावर प्रकाश टाकला जाईल. एमएफ हुसेन आणि एसएम पंडित सारख्या दिग्गज कलाकारांच्या भावनेला उजाळा देत, हा विभाग हाताने रंगवलेल्या पोस्टर्सच्या समृद्ध वारशाचा सन्मान करेल.
सर्व प्रवेशिकांपैकी, वेव्हज परिषदेत थेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 विद्यार्थी कलाकारांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात रिअल टाइममध्ये हाताने रंगवलेल्या चित्रपट पोस्टर्स तयार करताना त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले जाईल. सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या या माध्यमात त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट तीन विजेत्यांना पुरस्कृत केले जाईल.
फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज बद्दल अधिक माहिती.
वेव्हेज चित्रपट पोस्टर मेकिंग चॅलेंज हा चित्रपट कला साजरा करण्यासाठी, उदयोन्मुख प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि दृश्य रूपात कथा मांडणीच्या पारंपारिक आणि समकालीन स्वरूपांना जोडण्यासाठी आयोजित एका व्यापक उपक्रमाचा भाग आहे. अधिक माहितीसाठी आणि विजेत्यांच्या संपूर्ण यादीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या:
https://www.nfdcindia.com/waves-poster-challenge-2025/
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
***
PIB TEAM WAVES 2025 | N.Deshmukh/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Release ID:
(Release ID: 2122870)
| Visitor Counter:
51
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam