पंतप्रधान कार्यालय
गुड फ्रायडेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी अधोरेखित केले दया आणि करुणा या मूल्यांचे महत्त्व
प्रविष्टि तिथि:
18 APR 2025 12:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
गुड फ्रायडेच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येशू ख्रिस्तांच्या महान बलिदानाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या जीवनात दयाबुद्धी, करुणा आणि औदार्याचा अंगिकार करण्याचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे, यावर त्यांनी भर दिला.
एक्सवरील एका पोस्ट मध्ये ते म्हणालेः
“गुड फ्रायडेच्या दिवशी आपण येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचे स्मरण करतो. हा दिवस आपल्याला दयाबुद्धी, करुणा यांचे जतन करण्याचा आणि नेहमीच आपले हृदय विशाल ठेवण्याचा संदेश देतो. शांतता आणि एकजुटीची भावना नेहमीच कायम राहो.”
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122624)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam