पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च सन्मान प्रदान
Posted On:
05 APR 2025 5:47PM by PIB Mumbai
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायका यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "श्रीलंका मित्र विभूषण" पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार श्रीलंकेचा परदेशी नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्री दृढ करण्यामध्ये त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीने स्वीकारत , भारत आणि श्रीलंका यांच्यातील विशेष मैत्री तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील प्राचीन संबंधांना हा सन्मान अर्पण केला.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119351)
अभ्यागत कक्ष : 131
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam