पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने भारताचे सागरी क्षेत्र व बंदरांच्या सक्षमीकरणाप्रति सरकारची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली
Posted On:
05 APR 2025 9:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत. या निमित्ताने पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी सागरी क्षेत्र व बंदरांचे सक्षमीकरण करण्याच्या सरकारची वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : आजच्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त आपण भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचे आणि देशाच्या जडणघडणीत या क्षेत्राने बजावलेल्या भूमिकेचे स्मरण करत आहोत.
भारताच्या प्रगतीसाठी आम्ही आपल्या सागरी क्षेत्राचे आणि आपल्या बंदरांच्या सक्षमीकरणाचे काम सुरूच ठेवू.
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119163)
Visitor Counter : 24