पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगतार्न शिन्नावात यांच्या बरोबर आज ‘वाट फ्रा चेतुफोन विमोन मंगखालाराम राजवारामाहाविहान’ या स्थानाला भेट दिली. ‘वाट फो’ या नावाने हे स्थान ओळखले जाते.
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 3:23PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी तिथे असलेल्या निद्रिस्त बुद्ध मूर्तीला आदरांजली वाहिली व तेथील वरिष्ठ बौद्ध भिख्खुना ‘संघदान’ सादर केले. पंतप्रधानांनी निद्रिस्त बुद्धमंदिराला अशोकस्तंभाची प्रतिकृती देखील अर्पण केली. या प्रसंगी त्यांनी दोन्ही देशांमधील बळकट व विविधरंगी सांस्कृतिक अनुबंधांचा उल्लेख केला.
***
S.Kakade/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2118915)
आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam