माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्ह्ज (WAVES) परिषदेअंतर्गत आयोजित ‘क्रिएट इन इंडिया चैलेंज या आव्हानात्मक स्पर्धेच्या पहिल्या हंगामात 85,000 पेक्षा जास्त स्पर्धकांची नोंदणी, 1,100 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही सहभाग


WAVES CreatoSphere मध्ये 32 स्पर्धांमधील 750 अंतिम विजेते 1 ते 4 मे, 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होणार

Posted On: 01 APR 2025 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

 

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual and Entertainment Summit) अर्थात वेव्ह्ज (WAVES) परिषदेअंतर्गत आयोजित क्रिएट इन इंडिया चैलेंज या आव्हानात्मक स्पर्धेचा पहिला हंगाम येत्या 1 ते 4 मे, 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे पार पडणार आहे. या उपक्रमासाठीच्या नोंदणीने 85,000 पेक्षा जास्त नोंदणींचा नवा टप्पा गाठला असून त्यात 1,100 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही समावेश आहे. या उपक्रमासाठी अत्यंत काटेकोर निवड प्रक्रियेचा अवलंब करत विविध 32 स्पर्धांसाठी 750 पेक्षा जास्त अंतिम विजेत्यांची निवड केली गेली आहे. या सर्व विजेत्यांना या स्पर्धेतील त्यांचे यश आणि स्वतःची प्रतिभा जगासमोर सादर करण्याची  संधी मिळेल. याशिवाय, त्यांना आपल्या क्षेत्रातील आघाडीच्या  व्यावसायिक तज्ञांसोबत संवाद साधण्याची, गुंतवणूकदारांसमोर संकल्पना मांडण्याची (पिचिंग सेशन्स), तसेच मास्टरक्लास, निमंत्रितांची चर्चासत्रे, परिषदा या माध्यमातून जागतिक तज्ज्ञांकडून शिकण्याची संधीही मिळणार आहे. ‘क्रिएट इन इंडिया चैलेंज’ या आव्हानात्मक स्पर्धेच्या विजेत्यांना मुंबईत होणाऱ्या एका भव्य समारंभात ‘WAVES Creator Awards’ ने सन्मानित केले जाणार आहे.

या आव्हानात्मक स्पर्धांनी सृजनशील क्षेत्रात आपली दमदार छाप सोडली असून भारत आणि जागतिक स्तरावर नवोन्मेष आणि परस्परांसोबत जोडून घेण्याची नवी लाटच निर्माण केली आहे. या आव्हानात्मक स्पर्धेतअंतर्गतच्या विविध 32 स्पर्धांमध्ये उर्जेने भारलेली रील मेकिंग स्पर्धा, समस्यांवर आधारित ट्रूथ टेल हॅकाथॉन, द्रष्ट्या युवा चित्रपट दिग्दर्शकांसाठी यंग फिल्ममेकर चॅलेंज, आणि कल्पक कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप या आणि अशा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत अवतार निर्मिती स्पर्धा, वॅम (WAM!) अ‍ॅनिमे चॅलेंज, ई-स्पोर्ट्स टूर्नामेंट, ट्रेलर मेकिंग स्पर्धा, संकल्पनाधारीत संगीत स्पर्धा आणि अत्याधुनिक XR क्रिएटर हॅकेथॉन अशा मुख्य स्पर्धांची यात समावेश आहे. यामुळे क्रिएट इन इंडिया चैलेंज हा नव्या पिढीतील कथात्मक मांडणीकार, डिझाइनर आणि डिजिटल नवोन्मेषकांसाठी एक महत्त्वाचा मंच ठरला आहे.

क्रिएट इन इंडिया चैलेंजमुळे विविध क्षेत्र, देश आणि वेगवेगळ्या पिढ्यांना परस्परांशी जोडले गेले . त्यामुळेच ही आव्हानात्मक स्पर्धा केवळ भारतातील सृजनात्मक उर्जेचा सोहळा साजरा करणारा नाही, तर त्या ही पलिकडे जात कथात्मक मांडणी आणि डिजिटल अभिव्यक्तीच्या भविष्यासंदर्भात जागतिक संवादही निर्माण करणारा उपक्रम ठरला आहे. अशा प्रकारचा एकमेवाद्वितीय पाया रचल्यानंतर, क्रिएट इन इंडिया चैलेंज ही आव्हानात्मक स्पर्धा आपल्या भविष्यातील हंगामांमध्ये नवी उंची गाठण्यासाठी सज्ज झाली असून,  सर्जनशील व्यक्तीमत्वाचे सक्षमीकरण करण्याच्या आणि भविष्यातील सांस्कृतिक विश्वाच्या निर्मितीच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117554) Visitor Counter : 25