गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सिक्कीम मधील आपत्ती पुनर्वसन आणि पुनर्बांधणी उपक्रमांना तसेच पाच राज्यांमधील अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना दिली मंजुरी
महाराष्ट्र, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळ या पाच राज्यांसाठी ‘राज्यांमधील अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण’ योजनेअंतर्गत 1,604.39 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत 28 राज्यांसाठी 19,074.80 कोटी रुपये, आणि राज्य आपत्ती शमन निधी (एसडीएमएफ) अंतर्गत 16 राज्यांसाठी 3,229.35 कोटी रुपये केले जारी
Posted On:
28 MAR 2025 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सिक्कीम राज्यासाठी आपत्ती पुनर्वसन आणि पुनर्बांधणी प्रकल्प तसेच पाच राज्यांमधील अग्निशमन सेवांच्या बळकटीकरण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
अर्थमंत्री, कृषीमंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांचा समावेश असलेल्या या समितीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत, या राज्यांसाठी पुनर्वसन आणि पुनर्बांधणी निधी सहाय्य व आपत्ती सज्जता आणि क्षमता विकास निधी सहाय्य या माध्यमांमधून या राज्यांना वित्तीय साहाय्य प्रदान करण्याच्या प्रस्तावांवर विचार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपत्ती प्रतिरोधक भारताचा दृष्टीकोन साकारण्यासाठी, देशातील आपत्तींचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारतात आपत्ती जोखीम कमी करण्याची यंत्रणा बळकट करून आपत्तीदरम्यान होणारी मोठी जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
उच्चस्तरीय समितीने बिहार, गुजरात, झारखंड, महाराष्ट्र आणि केरळ या पाच राज्यांसाठी ‘राज्यांमधील अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण’ या योजनेंतर्गत 1,604.39 कोटी रुपयांच्या प्रकल्प/ उपक्रमांना मंजुरी दिली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत, आपत्ती सज्जता आणि क्षमता विकास अर्थसहाय्यासाठी निर्धारित वाटपातून, बिहारसाठी रु. 340.90 कोटी, गुजरातसाठी रु. 339.18 कोटी, झारखंडसाठी रु. 147.97 कोटी, केरळसाठी रु. 162.25 कोटी आणि महाराष्ट्रासाठी रु. 614.09 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
केंद्र सरकारने एनडीआरएफ अंतर्गत ‘राज्यांमधील अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण’ करण्यासाठी एकूण 5,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून, 20 राज्यांच्या एकूण 3,373.12 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना यापूर्वीच मंजुरी दिली आहे.
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत 28 राज्यांना 19,074.80 कोटी रुपये आणि राज्य आपत्ती शमन निधी (एसडीएमएफ) अंतर्गत 16 राज्यांना 3,229.35 कोटी रुपये दिले.
त्याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत 19 राज्यांना 5,160.76 कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती शमन निधी (एनडीएमएफ) अंतर्गत 08 राज्यांना 719.7 कोटी रुपये देण्यात वितरीत करण्यात आले.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2116189)
Visitor Counter : 30
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam