पंतप्रधान कार्यालय
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान झालेले करार आणि घोषणांची यादी
Posted On:
17 MAR 2025 2:27PM by PIB Mumbai
घोषणा:
1. भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) वर वाटाघाटी सुरू;
2. व्यावसायिक आणि कुशल कामगारांची गतिशीलता सुलभ बनवण्याबाबत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वाटाघाटी सुरू;
3. न्यूझीलंड हिंद-प्रशांत महासागर उपक्रम (IPOI) मध्ये सामील झाला;
4. न्यूझीलंड आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीचा (CDRI) सदस्य बनला
द्विपक्षीय दस्तावेज :
1. संयुक्त निवेदन
2. भारताचे संरक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार;
3. भारताचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) आणि न्यूझीलंड सीमाशुल्क सेवा यांच्यात अधिकृत आर्थिक ऑपरेटर - परस्पर मान्यता करार (AEO-MRA);
4. भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयादरम्यान फलोत्पादन सहकार्य करार;
5. भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयादरम्यान वनीकरणावर इरादा पत्र;
6. भारताचे शिक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या शिक्षण मंत्रालयादरम्यान शैक्षणिक सहकार्य करार; आणि
7. भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि न्यूझीलंड सरकारच्या स्पोर्ट न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य करार
***
S.Kane/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111827)
Visitor Counter : 32
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam