पंतप्रधान कार्यालय
डॉ. शंकर राव तत्ववादी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2025 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. शंकर राव तत्ववादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. शंकर राव तत्ववादी यांनी राष्ट्रउभारणी आणि भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. “त्यांच्याशी भारतात आणि परदेशात अनेक वेळा संवाद साधता आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांची वैचारिक सुस्पष्टता आणि काटेकोर कार्यपद्धती नेहमीच ठळकपणे उठून दिसते.” पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले आहे:
“डॉ. शंकर राव तत्ववादी यांच्या निधनाबद्दल दु:ख झाले. राष्ट्रउभारणी आणि भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ते स्मरणात राहतील. त्यांनी स्वतःला आरएसएससाठी समर्पित केले आणि त्याचा जागतिक प्रसार वाढवून आपला ठसा उमटवला. ते विद्वान होते. त्यांनी तरुणांमधील जिज्ञासेला नेहमीच प्रोत्साहन दिले. विद्यार्थी आणि अभ्यासक बीएचयूशी असलेल्या त्यांच्या नात्याचे नेहमी स्मरण ठेवतात. विज्ञान, संस्कृत आणि अध्यात्म यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांना रस होता.
भारतात आणि परदेशात त्यांच्याशी अनेकदा संवाद साधल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांची वैचारिक स्पष्टता आणि काटेकोर कार्यशैली नेहमीच वेगळी उठून दिसली.
ओम शांती.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2111355)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam