माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्ह्ज 2025 "रील मेकिंग" चॅलेंज
Posted On:
11 FEB 2025 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025
कथात्मक मांडणीच्या भविष्याला आकार देणे, एका वेळी एक रील
परिचय
वेव्ह्ज 2025 "रील मेकिंग" चॅलेंज ही एक अनोखी स्पर्धा आहे जी निर्मात्यांना आणि उत्साही सहभागींना अवघ्या 30-90 सेकंदांच्या संक्षिप्त फिल्म फॉरमॅटद्वारे मेटाची टूल्स वापरून त्यांचे कथाकथन कौशल्ये दाखवण्यास सक्षम बनवते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भागीदारीत इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या आव्हानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपूर्ण भारतातून आणि 20 देशांमधून 3,379 लोकांनी नोंदणी केली आहे. डिजिटल निर्मात्यांना प्रयोग, नवोन्मेष आणि लघु स्वरूपातील आशयाच्या सीमा रुंदावण्यासाठी एक व्यासपीठ यामुळे उपलब्ध झाले आहे.
हे चॅलेंज 1 ते 4 मे 2025 या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स मुंबई येथे आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्ह्ज ) अंतर्गत क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसचा एक प्रमुख उपक्रम आहे. वेव्ह्ज हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगात चर्चा, सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना देणारे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि हितधारकांना एकत्र आणणारी ही शिखर परिषद उदयोन्मुख संधींचा शोध घेईल, आव्हानांना सामोरी जाईल आणि जागतिक सर्जनशील केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करेल. 31 स्पर्धांमध्ये 70,000 हून अधिक नोंदणीसह, क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस सर्जनशीलता, प्रतिभा आणि आंतरराष्ट्रीय सहभागाला प्रोत्साहन देत आहे.

वेव्ह्ज 2025: जगभरातील निर्मात्यांना एकत्र आणले
वेव्ह्ज 2025 अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू केलेले "रील मेकिंग" चॅलेंज माध्यम आणि मनोरंजनासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचा उदय अधोरेखित करते, तसेच त्याच्या डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्थेची वेगवान वाढ प्रतिबिंबित करते. भारत सरकारच्या "क्रिएट इन इंडिया" संकल्पनेशी हे सुसंगत असून देशभरातील आणि देशाबाहेरील प्रतिभांना चालना देते.
या स्पर्धेने अफगाणिस्तान, अल्बेनिया, अमेरिका , अँडोरा, अँटिग्वा आणि बार्बुडा , बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती , ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यासह इतर देशांमधून उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय सहभाग आकर्षित केला आहे. जगभरात पोहोचलेल्या या स्पर्धेने सर्जनशील क्षेत्रातील भारताचा वाढता प्रभाव आणि जगभरातील आशय निर्मार्त्यांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून वेव्हजची लोकप्रियताही अधोरेखित केली आहे.
भारतातील विविध आणि दुर्गम भागांमधून या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या आहेत.
20 वर्षांवरील स्पर्धकांना भारताच्या तंत्रज्ञान विषयक तसेच पायाभूत सुविधांची प्रगती अधोरेखित करणारी 'विकसित भारत ' आणि '' इंडिया@2047' या विषयांवर देशाच्या भविष्यातील वाढीची कल्पना करून रील बनवायचे आहे. या संकल्पनानी कथात्मक मांडणी करणाऱ्या कलाकारांसाठी भारताचा अभिनव प्रवास टिपण्यासाठी, त्यांची सर्जनशीलता आणि देशाच्या प्रगतीबाबत दृष्टिकोन उलगडून दाखवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले आहे .
संकल्पना
खाद्यसंस्कृती, प्रवास, फॅशन, नृत्य आणि संगीत, गेमिंग, योग आणि निरामयता , रोड ट्रिप्स ,टेक
नियम
सज्ज व्हा
तुमचा आशय ठळकपणे दिसण्यासाठी स्वच्छ बॅकग्राउंड वापरा.
स्वच्छ आणि आकर्षक शॉट्ससाठी चांगली प्रकाशयोजना वापरा.
तुमच्या संदेशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी साधी वेशभूषा करा.
रिलची भाषा बोला
ट्रांझिशन्स, क्विक कट्स आणि स्नॅपी एडिट्सचा प्रयोग करा.
प्रामाणिक रहा, वास्तव प्रेक्षकांना खिळवून ठेवते
काटेकोर पालन करा
कालावधी : 30-90 सेकंद
तुमच्या वाईब्सशी जुळतील असे ट्रेंडिंग म्युझिक ट्रॅक वापरा.
दिलेली संकल्पना आणि टॅग @wavesreelmaking बरोबर तुमची रील सुसंगत असावी.
रील मार्गदर्शक तत्त्वे
सर्जनशीलता आणि अस्सलपणा :भारताची संस्कृती, कामगिरी आणि माध्यमाची ताकद दाखवणारी अनोखी कथा मांडा
संकल्पनेला अनुरूप : तुमचे रील दिलेली संकल्पना प्रतिबिंबित करेल याची काळजी घ्या , आशय निर्मितीचे केंद्र म्हणून भारताला अधोरेखित करा.
दिसायला आकर्षक आणि दर्जेदार : उच्च निर्मिती मूल्ये राखा , इंस्टाग्राम रिल्ससाठी योग्य आकर्षक दृश्ये, ध्वनी आणि एडिटिंग ठेवा
फॉरमॅटमध्ये नवोन्मेष : कथाकथन समृद्ध बनवण्यासाठी इंस्टाग्राम टूल्स ,फिल्टर्स, इफेक्टस आणि ट्रांझिशन्सचा वापर करा
नोंदणी: नोंदणीची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे. त्यानंतर अंतिम फेरीसाठी आठ विजेते घोषित केले जातील
सहभाग : वैयक्तिकरित्या किंवा दोन सदस्यांचा संघ सहभागी होऊ शकतो.
पुरस्कार आणि दखल
मेटाच्या वतीने आयोजित कार्यक्रम आणि रील्स मास्टरक्लास 2025 साठी खास निमंत्रण.
वेव्हज या परिषदेसाठी संपूर्ण खर्चासह प्रवेश,
विजेत्या रील्स वेव्हज हॉल ऑफ फेम, वेव्हजचे अधिकृत संकेतस्थळ आणि समाजमाध्यमांवर प्रदर्शित केल्या जातील.
अंतिम फेरीतील स्पर्धकांना जागतिक आशय निर्मिती (कंटेंट क्रिएटर) स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मंत्रालयाद्वारे सहाय्य पुरवले जाणार.
संदर्भ:
https://wavesindia.org/challenges-2025
https://eventsites.iamai.in/Waves/reelmaking/
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2099990
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101910)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam