शिक्षण मंत्रालय
परिक्षा पे चर्चा 2025
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदर्शनसह अनेक माध्यमांतून संवाद साधणार आहेत.
‘परिक्षा पे चर्चा’ यातून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून एकूण निवडक 36 विद्यार्थी पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधतील
मानसिक आरोग्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंत,अशा विविध विषयांमधील श्रेष्ठ तज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी या सर्वात आकर्षक आणि परस्परसंवादी पद्धतीने होणाऱ्या ‘परिक्षा पे चर्चा’( PPC 2025) या कार्यक्रमात सामील होणार आहेत.
आतापर्यंत देशभरातील 5 कोटी विद्यार्थ्यांच्या सहभागासह PPC 2025 या कार्यक्रमाने विक्रम प्रस्थापित केला आहे
Posted On:
06 FEB 2025 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025
बहुप्रतीक्षित परिक्षा पे चर्चा -2025 (PPC 2025) हा कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना परीक्षेची तयारी, तणाव व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास याविषयांवर मार्गदर्शन करतील.
राज्य / केंद्रशासित प्रदेश मंडळाच्या सरकारी शाळा, केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा,सीबीएसईच्या शाळा (CBSE) आणि नवोदय विद्यालयांतून या वर्षी, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील मिळून एकूण 36 विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करण्यात आली आहे. काही विद्यार्थी प्रेरणा (PRERANA) शाळा कार्यक्रमांतील माजी विद्यार्थी,कला उत्सव आणि वीर गाथा विजेते आहेत. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली आहे , यातून भारताच्या विविधतेचे आणि सर्वसमावेशकतेचे खरे प्रतिबिंब दिसते.
पीपीसी-2025(PPC 2025) हा कार्यक्रम एक नवीन अध्याय सुरू करत,आपल्या आठ भागांच्या या कार्यक्रमाला एका रोमहर्षक नवीन स्वरूपात उलगडेल.यावेळी पंतप्रधानांसोबतचा झालेला पहिला संवाद दूरदर्शन, स्वयम, स्वयंप्रभा, पीएमओ यूट्यूब चॅनल आणि शिक्षण मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण (I&B) मंत्रालयाच्या समाज माध्यम चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल, देशभरातील दर्शकांना या समृद्ध अनुभवामध्ये सहभागी होता येईल.
परिक्षा पे चर्चा हे जनआंदोलन बनल्यामुळे,सामुदायिक सहभाग वाढवत आमच्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे महत्त्वाच्या लक्ष दिले जात आहे. त्यानुसार, आठव्या आवृत्तीत, म्हणजे, PPC 2025 मध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्वांचा समावेश होणार आहे; जे त्यांचे अनुभव आणि ज्ञान यातून सामायिक करतील, तसेच PPC च्या पुढील 7 भागांतून विद्यार्थ्यांना जीवन आणि शिक्षणाच्या प्रमुख पैलूंवर मार्गदर्शन करतील.
या सत्रात भाग घेणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्य केंद्रशासित प्रदेश तसेच विविध शैक्षणिक संस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धांमधून विशिष्ट प्रक्रियेद्वारे निवडले गेले आहेत. या कार्यक्रमाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- क्रीडा आणि शिस्त: एमसी मेरी कोम, अवनी लेखारा, सुहास यथीराज हे उद्दिष्टनिश्चिती, सातत्य, आणि शिस्तबद्धतेतून तणाव व्यवस्थापन यावर संबोधित करतील.
- मानसिक आरोग्य: भावनिक आरोग्य आणि स्व-प्रगटीकरण यांचे महत्त्व याबद्दल दीपिका पडुकोण चर्चा करतील.
- पोषण: आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी आणि शैक्षणिक स्तरावरच्या यशामध्ये उत्तम झोपेची भूमिका या विषयांवर सोनाली सबरवाल आणि ऋजुता दिवेकर या प्रकाश टाकतील. फूडफार्मर म्हणून प्रसिद्ध असणारे रेवंत हिमतसिंगका हे ‘आरोग्यपूर्ण जीवनपद्धती आचरणात आणणे’ यावर माहिती देतील.
- तंत्रज्ञान आणि अर्थनियोजन: गौरव चौधरी म्हणजेच टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता या उत्तम शिक्षण तसेच आर्थिक साक्षरता यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याबद्दलची माहिती देतील.
- सर्जनशीलता आणि सकारात्मकता: कल्पनादर्शन आणि नकारात्मक विचारांचा विळखा सोडवणे तसेच सकारात्मक विचार जोपासणेे या विषयावर विक्रांत मेस्सी आणि भूमी पेडणेकर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करतील.
- सजगता आणि मानसिक आरोग्य: विद्यार्थ्यांना मानसिक स्पष्टता आणि लक्षप्राप्ती याबद्दल सहाय्यक ठरणारी सजगता तंत्रे सद्गुरू सामायिक करतील.
- यशसिध्दीच्या कहाण्या: यूपीएससी, आयआयटी, जेईई, CLAT, सीबीएससी, एनडीए, आयसीएसई यासारख्या विविध परीक्षांमधले उत्कृष्ट श्रेणीतले विद्यार्थी हे सहभागीना परीक्षा पे चर्चा च्या आधीचे भाग सामायिक करतील आणि त्यांना परीक्षेची तयारी करताना तसेच प्रेरणा घेण्यासाठी त्यांना या विविध तयारीच्या प्रक्रियांचा कसा उपयोग झाला याबद्दल माहिती देतील.
परीक्षा पे चर्चा 2018 मधील आरंभापासूनच हा कार्यक्रम एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून उदयाला आला आहे आणि या वर्षीच्या सत्रांमध्ये पाच कोटींसह जास्त जणांनी सहभाग घेऊन आधीचे विक्रम मोडले तसेच याला सर्वाधिक उपयुक्त आणि परिणामकारक मंत्र म्हणून अधोरेखित केले.
शिक्षण मंत्रालयाने विशेष प्रयत्न घेऊन विविध पार्श्वभूमीचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक हा कार्यक्रम बघतील याची काळजी घेतली आणि यामुळे परीक्षा पे चर्चा हा एक परिवर्तनशील पुढाकार असून लहान मुलांच्या मनाला दिशा देण्यासाठी तसेच शैक्षणिक यश व वैयक्तिक विकास यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम म्हणून लोकप्रिय झाला आहे.
लाईव्ह अपडेटसाठी सहभागींचे तपशील तसेच सर्वसमावेशक कल्पना यासाठी शिक्षण मंत्रालय तसेच माहिती आणि प्रसारण विभागाच्या समाजमाध्यम मंचासोबत संपर्कात रहा.
* * *
JPS/ST/Sampada/Vijaya/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![](http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg)
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2100297)
Visitor Counter : 17
Read this release in:
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam