पंतप्रधान कार्यालय
ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीतकार चंद्रिका टंडन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
03 FEB 2025 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025
संगीतकार चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारतीय संस्कृतीबद्दल चंद्रिका टंडन यांना असलेली आवड आणि उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्या व संगीतकार म्हणून त्यांनी केलेले कार्य, याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे:
“त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल @chandrikatandon यांचे अभिनंदन. उद्योजक, परोपकारी आणि अर्थातच संगीतकार म्हणून त्यांच्या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे ! भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना असलेली आवड आणि ती लोकप्रिय करण्यासाठी त्या करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
न्यूयॉर्क येथे वर्ष 2023 मध्ये त्यांच्यासोबत झालेली भेट लक्षात राहणारी आहे.”
* * *
S.Kakade/H.Kenekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2099132)
Visitor Counter : 26