संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाच्या पहिल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


10,000 हून अधिक धावपटूंनी घेतला सहभाग

Posted On: 02 FEB 2025 6:26PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाच्या पहिल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आज 02 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले. 10,000  हून अधिक धावपटूंनी सहभागी होत या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात 21.1 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन गटांमध्ये शर्यती झाल्या. याद्वारे विविध क्षमता आणि पार्श्वभूमी असलेल्या धावपटूंना संधी प्राप्त झाली.

मुख्य शर्यती - 21.1 किमी आणि 10 किमी शर्यतींचा शुभारंभ भारत सरकारचे युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख एल. मांडविया यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्यासोबत संरक्षण दल प्रमुख , नौदलप्रमुख, हवाई दलप्रमुख तसेच संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी आणि नागरी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला होता. शर्यतीचा मार्ग इंडिया गेट आणि ऐतिहासिक कर्तव्यपथावरून आखण्यात आला होता. यामुळे सर्व सहभागींसाठी ही शर्यत एक अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली. स्पर्धा आयोजनातील मुख्य भागीदार आयडीएफसी फर्स्ट बँक, सहकारी भागीदार आयओसीएल आणि टायटन वॉचेस यांचे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी स्पर्धेला उपस्थित होते. नामवंत क्रीडापटूंच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला.

विजेत्यांची यादी (प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन क्रमांकांसाठीची यादी सोबत, भारतीय नौदल अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते 2025.) खालीलप्रमाणे:

Indian Navy Half Marathon Winners 2025.pdf

21.1 किमी (अर्ध मॅरेथॉन)

पुरुष (खुला गट): कुलबीर सिंग (1:04:52)

महिला (खुला गट): वृंदा भंडारी (1:37:08)

10 किमी

पुरुष (खुला गट): प्रकाश देशमुख (0:30:22)

महिला (खुला गट): कविता (0:35:36)

5 किमी

पुरुष (खुला गट): गौरव कसाना (0:14:14)

महिला (खुला गट): अंजली (0:17:37)

***

S.Patil/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2099011) Visitor Counter : 35