अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

छोट्या मोड्यूलर अणुभट्ट्यांच्या (SMR) संशोधन व विकासासाठी अणु उर्जा अभियान सुरू केले जाणार – अर्थसंकल्प 2025-26


2033 पर्यंत भारतात विकसित किमान 5 SMR कार्यान्वित होणार

Posted On: 01 FEB 2025 12:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025

 

संसदेत आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रिय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, छोट्या मोड्यूलर अणुभट्ट्यांच्या (SMR) संशोधन आणि विकासासाठी 20,000 कोटी रुपये खर्चाचा आराखडा असलेले अणु उर्जा अभियान सुरू केले जाणार आहे. वर्ष 2033 पर्यंत भारतात विकसित केलेले किमान 5 SMR कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी दिली. 

आपल्या उर्जा रुपांतरणाच्या प्रयत्नांसाठी 2047 पर्यंत किमान 100 GW अणु उर्जा निर्मिती क्षमता विकसित होणे गरजेचे आहे हा मुद्दा सीतारामन यांनी अधोरेखित केला. या उद्दीष्टपूर्तीसाठी खाजगी क्षेत्रासोबत सक्रिय भागीदारी करण्यासाठी अणु उर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसंदर्भातील नागरी उत्तरदायित्व कायदा यामध्ये सुधारणा करण्याचे काम करण्यात येईल.  

वीज वितरण व्यवस्थेतील सुधारणा आणि आंतरराज्य वीज पारेषण क्षमता वाढीसाठी राज्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. यामुळे वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीत व निर्मिती क्षमतेत सुधारणा होईल. या सुधारणांसाठी राज्यांना त्यांच्या GSDP च्या 0.5 टक्के इतकी रक्कम अतिरिक्त कर्ज म्हणून घेण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. 

उर्जा सुरक्षेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2098441

 

* * *

JPS/S.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2098682) Visitor Counter : 25