अर्थ मंत्रालय
जल जीवन अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 67,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवली
जल जीवन अभियान 2028 पर्यंत वाढवले
पुढील तीन वर्षांत 100% व्याप्ती साध्य करण्याचे ध्येय
Posted On:
01 FEB 2025 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025
जल जीवन अभियानासाठी एकूण अर्थसंकल्पीय तरतूद 67,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना सांगितले. या अभियानाचा विस्तार 2028 पर्यंत करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
भारतातील ग्रामीण लोकसंख्येच्या 80 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 कोटी कुटुंबांना 2019 पासून जल जीवन अभियानाचा फायदा झाला आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या . या अभियानांतर्गत नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे आणि पुढील तीन वर्षांत 100 टक्के लोकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
जल जीवन अभियानाचे लक्ष्य "जन सहभागा"द्वारे ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर तसेच प्रचालन आणि व्यवस्थापनावर (ओ अँड एम) असेल, हे त्यांनी स्पष्ट केले. शाश्वतता आणि नागरिक-केंद्रित पाणी सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत स्वतंत्र सामंजस्य करार केले जातील, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
* * *
G.Chipalkatti/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2098617)
अभ्यागत कक्ष : 143
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam