पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इस्रोच्या ऐतिहासिक 100 व्या प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 29 JAN 2025 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) 100 व्या ऐतिहासिक प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले आहे. आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा दृष्टीकोन, समर्पण आणि बांधिलकी दर्शवणारा हा अतुलनीय टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रवासात खासगी क्षेत्राच्या वाढत्या भूमिकेवर भर देत, अंतराळ संशोधनात देश नवी उंची गाठत राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे:

“ऐतिहासिक 100 व्या प्रक्षेपणाबद्दल @isro चे अभिनंदन!

हा अतुलनीय टप्पा आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची दूरदृष्टी, समर्पण आणि बांधिलकी दर्शवितो.

खासगी क्षेत्राच्या सहयोगाने भारताचा अंतराळ प्रवास नवी उंची गाठत राहील.” 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2097479) आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Khasi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam