माहिती आणि प्रसारण मंत्रालय
76 ऑन 76: वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपसह भारतातील सर्जनशील विविधता साजरी करणे
76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चॅलेंजच्या उपांत्य फेरीतील76 स्पर्धकांची घोषणा; यामध्ये 40 हौशी निर्माते, 30 व्यावसायिक आणि 6 जणांचा विशेष उल्लेख, अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी सज्ज
कॉमिक चॅलेंज भारतीय कॉमिक निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि नवीन भागीदारी बनवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2025 8:38PM
|
Location:
PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025
76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरूच ठेवत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंडियन कॉमिक्स असोसिएशन बरोबर भागीदारीमध्ये वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील 76 स्पर्धकांची घोषणा केली आहे.

भारतीय कॉमिक्समधील विविधतेचा उत्सव
हा ऐतिहासिक उपक्रम देशभरातील सर्जनशील निर्मात्यांची प्रतिभा प्रदर्शित करून भारतीय कॉमिक्सच्या विविधतेचा उत्सव साजरा करत आहे. 20 राज्ये आणि एनसीआरमधील 50 शहरांमधील निर्मात्यांनी प्रचंड संख्येने दाखल केलेल्या प्रवेशिकांमधून निवड झालेले उपांत्य फेरीचे स्पर्धक हे देशाच्या विविध प्रांतांमधील आहेत ही उल्लेखनीय बाब आहे.

निवड झालेल्यांमध्ये मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु सारख्या प्रमुख महानगरांमधील निर्मात्यांचा तसेच आनंद, बेतुल, कालका, समस्तीपूर यांसारखी छोटी शहरे आणि गुवाहाटी आणि इंफाळ सारख्या ईशान्येकडील शहरांचा देखील समावेश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्याप्रति या स्पर्धेची बांधिलकी यातून दिसून येते.
भारताच्या ऊर्जाशील कॉमिक बुक संस्कृतीचा हा दाखला असून या प्रतिभावान निर्मात्यांना सर्वांसमोर त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वेव्हज वचनबद्ध आहे. उपांत्य फेरीत, 10 ते 49 वर्षे वयोगटातील 40 हौशी आणि 30 व्यावसायिकांचा समावेश आहे.

तसेच उपांत्य फेरीच्या स्पर्धकांमध्ये युवा कलाकारांसाठी 6 विशेष उल्लेखांचा समावेश असून सर्व स्तरांवर प्रतिभेला वाव देण्याप्रति या स्पर्धेची वचनबद्धता यातून दिसते.

"जागतिक स्तरावर भारतीय कॉमिक्सचा प्रचार करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत भागीदारी करताना इंडियन कॉमिक्स असोसिएशनला आनंद होत आहे" असे भारतीय कॉमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष अजितेश शर्मा म्हणाले." सर्जनशील उद्योगांना पाठिंबा देण्याच्या आणि उदयोन्मुख प्रतिभांना संधी प्रदान करण्याप्रति आपल्या सरकारच्या वचनबद्धतेचे हा उपक्रम एक ठळक उदाहरण आहे."
वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप
वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप हा जागतिक स्तरावर भारतातील सर्जनशील उद्योगांना स्थान मिळवून देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'क्रिएट इन इंडिया' उपक्रमाला चालना देणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या स्पर्धेने भारतीय निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि नवीन भागीदारी बनवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले आहे
माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच इंडियन कॉमिक्स असोसिएशन यांनी उपांत्य फेरीतील 76 स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि स्पर्धेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2097459
| Visitor Counter:
106
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
हिन्दी
,
Nepali
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
Urdu