माहिती आणि प्रसारण मंत्रालय
महाकुंभ 2025: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतातील नवीन फौजदारी कायदयांविषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज येथे आयोजित केले डिजिटल प्रदर्शन
Posted On:
21 JAN 2025 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, प्रयागराज मधील महाकुंभमेळ्यात त्रिवेणी मार्गावर, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या भारतातील नवीन फौजदारी कायदयांविषयी तपशीलवार आणि आकलन सुलभ माहिती देणारे आकर्षक डिजिटल प्रदर्शन मांडले आहे.

याशिवाय या प्रदर्शनात ॲनामॉर्फिक प्रतिमा, एलईडी टीव्ही स्क्रीन, एलईडी भिंती आणि होलोग्राफिक सिलेंडर यांच्या सहाय्याने भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, नवीन धोरणे, कायदे आणि भारतीय संविधानाबद्दल माहिती देण्यात आली आहे. नवीन कायदे हे न्याय आणि निःपक्षपातीपणावर आधारित असून तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधून न्याय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी कायदेशीर चौकट तयार करण्यात आली असल्याचे दृक श्राव्य माध्यमातून सांगितले जात आहे.

भारताची न्यायप्रणाली अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि आधुनिक समाजाशी सुसंगत करण्याच्या उद्देशाने नवीन कायद्यांची रचना करण्यात आली आहे. हे नवीन कायदे भारताच्या न्यायिक व्यवस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करत असून सायबर अपराध आणि संघटित गुन्हेगारी यांसारख्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी एक नवीन चौकट प्रदान करत असतानाच पीडितांना न्यायदान सुनिश्चित करतात.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2094969)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam