पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय महिला संघाचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2025 9:20PM by PIB Mumbai

 

 

पहिल्यांदाच झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यावर लिहिलेला अभिनंदनपर संदेश :

पहिल्यांदाच झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय त्यांचे अतुलनीय कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचे फलित आहे.

या विजयामुळे भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक खेळांपैकी एक असलेल्या असलेल्या खेळाकडे लक्ष वेधले गेले आहे, या विजयाने देशभरातील असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा या खेळाकडे वळण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होवो.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2094400) आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam