पंतप्रधान कार्यालय
विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदयात आणि मनात विशेष स्थान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
17 JAN 2025 5:54PM by PIB Mumbai
विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदयात आणि मनात विशेष स्थान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवली सहाय्य देण्याचा निर्णय घेतला गेला अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदय आणि मनात विशेष स्थान आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवली सहाय्य देण्याचा निर्णय घेतला गेला. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत पोलाद क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला गेला आहे.
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2093919)
Visitor Counter : 9