सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भाषिणी : बहुभाषिक नवोन्मेषाच्या माध्यमातून महाकुंभ मेळ्यात माहिती सामायिक करण्याच्या आणि त्याचा उपयोग करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवण्यास सज्ज


देशाच्या भाषिक विविधतेचे एकीकरण

Posted On: 16 JAN 2025 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025

 
प्रस्तावना

भाविकांचा प्रचंड मोठा मेळा असलेला, दर 12 वर्षांनी भरणारा महाकुंभ मेळा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे शिखर आहे. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या या मेळ्यात विविध भाषा बोलणारे लोक मोठ्या संख्येने येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व सहभागींसाठी अखंड संवाद आणि पोहोच सुनिश्चित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक क्रांतिकारी उपक्रम 'भाषिणी' राबवत आहे. 11 भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक पोहोच प्रदान करून या महाकुंभ मेळ्यात माहिती सामायिक करण्याच्या आणि त्याचा उपयोग करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणण्यास सज्ज आहे.

महाकुंभ 2025 मध्ये भाषिणी कसा बदल घडवत आहे

महाकुंभ मेळ्यासाठी येणाऱ्यांची प्रचंड मोठी संख्या आणि त्यांची भाषिक विविधता, यामुळे खरे तर लॉजिस्टिक आणि संप्रेषण याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण आव्हाने निर्माण होतात. भाषिणी आपल्या प्रगत बहुभाषिक क्षमतांच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करते :

रिअल टाइम माहितीचा प्रसार : भाषिणी 11 भारतीय भाषांमध्ये घोषणा, कार्यक्रम वेळापत्रक आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे भाषांतर सुलभ करते. यामुळे यात्रेकरूंची मातृभाषा कोणतीही असली तरी कुंभमेळ्यात  महत्त्वाची माहिती मिळण्याची सुनिश्चिती होते.

सोपे दिशादर्शन : जिथे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात तिथे भाषेच्या अडचणीमुळे मार्ग सांगणे गुंतागुंतीचे होते. भाषिणीची स्पीच-टू-टेक्स्ट आणि टेक्स्ट-टू-स्पीच टूल्स आणि मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि किओस्कसहा जोडलेले बहुभाषिक चॅटबॉट, यात्रेकरूंना त्यांच्या पसंतीच्या भाषेत मार्गदर्शन करतात आणि या धार्मिक कार्यक्रमाचे त्यांचे समाधान वृद्धिंगत करतात.

आपत्कालीन सेवेपर्यंत सुलभ पोहोच : हेल्पलाइन्स  आणि आपत्कालीन सेवांसाठी बहुभाषिक पोहोच, तात्काळ प्रभावी साहाय्य सुनिश्चित करते आणि सुरक्षितता वृद्धिंगत करते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहयोगाने 112-आपत्कालीन हेल्पलाईनसह संवाद साधण्यात भाषिणीचे CONVERSE हे फिचर मदत करते. यात भाविकांना भाषिक आव्हानांवर मात करण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी आहेत.

ई-प्रशासन सक्षम करणे: भाषिणीच्या साहाय्याने अधिकारी विविध भाषिक भाविकांपर्यंत नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि सार्वजनिक सेवा याविषयीच्या उदघोषणा  पोहोचवू शकतात आणि  सुरळीत समन्वय साधू शकतात.

हरवले आणि सापडले: भाषिणीचे  'डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्यूशन' हे एक प्रमुख फिचर आहे. यामुळे भाविकांना त्यांच्या मूळ भाषेत व्हॉइस इनपुट वापरून हरवलेल्या किंवा सापडलेल्या वस्तूंची नोंद करणे शक्य होते.  रिअल-टाइम मजकूर आणि व्हॉइस भाषांतरांसह परस्परसंवाद सुलभ होतो.

कुंभ सहायक चॅटबॉट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेला  कुंभ सहायक(Sah'AI'yak ) हा एक एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता -संचालित, बहुभाषिक, व्हॉइस एनेबल्ड चॅटबॉट आहे.  महाकुंभ  2025 साठी येणाऱ्या  लाखो अभ्यागतांना मदत करण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे. हा बॉट अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाद्वारे (जसे की लामा एलएलएम) समर्थित आहे. भाविकांच्या माहिती आणि दिशादर्शन याविषयीच्या गरजा पूर्ण करून महाकुंभ 2025 चा त्यांचा अनुभव संस्मरणीय करणे हा कुंभ सहायकचा हेतू आहे. सर्वांना अखंड, रिअल-टाइम माहिती आणि दिशादर्शन सहाय्य प्रदान करून अभ्यागतांना वर्धित अनुभूती प्रदान करण्यासाठी कुंभ सहायक चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. भाषिणीचे भाषांतर हिंदी, इंग्रजी आणि इतर 9 भारतीय भाषांसह 11 भाषांमध्ये चॅटबॉटला समर्थन पुरवते.

भाषिणीविषयी

भाषिणी अर्थात भाशा इन्टरफेस फॉर इंडिया (BHASHa INterface for Indi) हा देशातील डिजिटल सामग्री आणि सेवांच्या उपलब्धतेविषयक परिसंस्थेचे लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेला, देशाच्या भाषिक अवकाशातील अनोखा पथदर्शी उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसमावेशकता आणि सुलभतेला चालना दिली जात असून, या उपक्रमाची उद्दिष्टे ही  डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या उद्दीष्टांशी सुसंगत आहेत. राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियानाचा (National Language Translation Mission - NLTM) भाग असलेल्या, भाषिणी या उपक्रमासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक तंत्रज्ञान आणि भाषेच्या नैसर्गिक प्रक्रिया विषयक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे हा उपक्रम देशभरात भाषांमुळे निर्माण होणारे अंतर कमी करणारा दुवा म्हणून कामी येणार असून, वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत सामग्री आणि सेवा उपलब्ध होऊ शकणार आहेत. भाषिणी (अनुवाद अभियान) हा उपक्रम,  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कलम 8 अंतर्गत येणाऱ्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या कंपनीअंतर्गतच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाच्या भाषिणी या उपविभागाद्वारे राबवला जात आहे.

भाषिणीची उद्दिष्टे

भारतीय भाषांविषयीचे शाश्वत तंत्रज्ञान, उपाय योजना आणि परिसंस्थाविषयक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीचे दीर्घकालीन धोरण.

इंटरनेटचा सुलभतेने वापर करता यावा यासाठी भारतीय भाषाविषयक तंत्रज्ञान आणि उपाय योजनांचा अवलंब करणे

इंटरनेटवरील भारतीय भाषेतील आषय सामग्री आणि तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवणे

भारतीय भाषाविषयक तंत्रज्ञान, उपाययोजना, अॅप्लिकेशन डेटा सेट आणि (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत ) प्रारुपांकरता प्रमाणविषयक अर्थशास्त्राचा (economies of scale ) अवलंब करणे

भारतीय भाषाविषयक तंत्रज्ञानाला अत्याधुनिक उत्क्रांतीवादी आणि क्रांतिकारी संशोधनाची जोड देणे.

स्वदेशी बौद्धिक मालमत्ता (intellectual property - IP) निर्मिती प्रोत्साहन देणे आणि ही प्रक्रिया सुलभ करणे.

तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना देणे, त्यासंबंधी सकारात्मक संधी निर्माण करणे, प्रोत्साहनपर लाभ देणे

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांसोबत सहकार्यपूर्ण भागीदारी तसेच भागीदारी विषयक उपक्रम सुरु करणे

भागीदारीतील संशोधन, व्यावसायीकरणाविषयी जागरूकता आणि क्षमता वृद्धीला चालना देणे

या अभियानासाठी डेटा विषयक धोरणाचा अवलंबं आणि अंमलबजावणी करणे.

भाषिणीचे अनुप्रयोग (अॅप्लिकेशन)

भाषिणी अर्पण अनुप्रयोग  (अॅप्लिकेशन)

अनुवाद (वेब सेवा मजकूर अनुवाद) : एका भाषेतील मजकूराचे दुसऱ्या भाषेत सुलभरित्या अनुवाद करणारे अभिनव तंत्रज्ञान.

चित्रानुवाद (व्हिडिओ अनुवाद): चित्रनुवाद हे विविध भारतीय भाषांमधील व्हिडिओंचा अनुवाद करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सर्वांना वापरासाठी खुले असणारे (ओपन - सोर्स) व्यासपीठ आहे.

लेखानुवाद (दस्तऐवज अनुवाद): विविध भारतीय भाषांमधील दस्तऐवजांच्या अनुवाद, आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून सुस्पष्ट आणि बिनचूक संवादाची सुनिश्चित करणारा अनुप्रयोग.

भाषिणी अनुवाद प्लगीन (वेब अनुवाद प्लगीन) : या उपक्रमाअंर्गत विकसित केलेल्या या अतिशय सक्षम प्लगीनचा वापर करून संकेतस्थळांवरील पानांचे (इंटरनेटवरील पानांचे) एका पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये अनुवाद करता येतो.

भाषिणी वेब अनुवाद व्यवस्थापन कन्सोल - WTMC  : हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित संकेतस्थळ अनुवाद प्लगीन आहे. याचा वापर करून संकेतस्थळावरील आशय सामग्रीचे इंग्रजी आणि 22 भारतीय भाषांमध्ये अनुवाद करता येतो.

वाणी अनुवाद (स्पीच-टू-स्पीच ट्रान्सलेशन / आवाजी बोलणे ते आवाजी बोलण्यात अनुवाद ): भारतीय भाषांचे प्रत्यक्ष त्या त्या क्षणाला  आवाजी बोलणे ते आवाजी बोलण्यामध्ये अनुवाद, यामुळे विविध भाषांमध्ये परस्परांसोबत संवाद साधणे अत्यंतिक सुलभ होणार आहे.

भाषिणी संबंधीच्या अलीकडील घडामोडी

जानेवारी 2025 मध्ये लष्कर दिनाचे औचित्य साधून संरक्षण उत्पादन विभागाचे भाषिणीसोबत एकात्मिककरण केलेले संकेतस्थळ 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले गेले.

जानेवारी 2025 मध्ये ई - श्रम पोर्टलला बहुभाषिक कार्यक्षमतेची जोड दिली गेली. याआधी हे पोर्टल केवळ इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि मराठी भाषेत उपलब्ध होते. आता ई - श्रम पोर्टल अद्ययावत करून ते 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी भाषिणी प्रकल्पाचा उपयोग करून घेण्यात आला आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये, भाषिणीच्या सहकार्याने विकसित केलेले बहुभाषिक ई-ग्राम स्वराज या व्यासपीठाचा प्रारंभ केला गेला. भाषेच्या मर्यादांवर मात करत, प्रत्येक नागरिकाला त्यांच्या भाषेत सुलतेने डिजिटल सेवांचा वापर करता येईल याची सुनिश्चिती करणे या उद्देशाने हे व्यासपीठ सुरू करून दिले गेले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (AICTE) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांनी तंत्रज्ञानाच्या पुस्तकांसह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी अनुवादिनी ऍप वापरले आहे.ही भाषांतरित पुस्तके इ-कुंभ पोर्टलवर उपलब्ध आहेत.

प्रशासकीय सुधारणा व नागरी तक्रार निवारण विभाग, कित्येक सरकारी फाइल्स व अहवालांचे भाषांतर करण्यासाठी भाषिणीचे अनुवादिनी ऍप वापरत आहे. यामध्ये NESDA वे फॉरवर्ड, CPGRAMS शी संबंधित मंत्रालये, सरकारी विभाग यांचे अहवाल, CPGRAMS चे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांबाबतचे अहवाल, CPGRAMS चे वार्षिक अहवाल, तक्रार निवारण निर्देशांक अहवाल, सचिवालय सुधारणा अहवाल आणि विभागाचा मासिक सारांश अहवाल यांचा समावेश आहे. CPGRAMS हे तक्रार निवारणासंदर्भातील देशातील सर्वात मोठे पोर्टल आहे. या पोर्टलवर निरनिराळ्या 22 भाषांमध्ये तक्रार नोंदविता येते. CPGRAMS वरील भाषिणी सुविधेच्या मदतीने नागरिक आपली प्रादेशिक भाषा वापरुन आपल्या तक्रारीचे निवारण करवून घेऊ शकतात. दरवर्षी 2.5 लाख तक्रारदार या सुविधेचा वापर करत आहेत.

भाषिणीचे उल्लेखनीय यश–

दर महिन्याला 100 कोटींपेक्षा जास्त निष्कर्ष – भाषिणीने दर महिन्यात 100 कोटींपेक्षा जास्त निष्कर्षांचा टप्पा यशस्वीपणे पार केला. यातून भाषिणीचा कृत्रिम प्रज्ञा भाषा तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती व्याप्ती आणि प्रभाव दिसून येतो.

50 पेक्षा जास्त आस्थापनांकडून वापर – भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ NPCI, रिझर्व्ह बँक नवोन्मेष उपक्रम मंच RBIH, ग्रामीण विकास मंत्रालय, लोकसभा, राज्यसभा यासारख्या सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील मिळून 50 पेक्षा जास्त आस्थापना आता भाषिणीसोबत सहयोग करत आहेत.

700,000 हून अधिक मोबाईल ऍप डाऊनलोड – भाषिणीचे मोबाईल ऍप्स 500,000 हून अधिक वेळा डाऊनलोड केले गेले आहेत. यातून भाषिणीची वाढती स्वीकारार्हता आणि  सुलभता लक्षात येते.

100 पेक्षा जास्त वापर दाखले – भाषिणी वेगवेगळ्या 100 पेक्षा जास्त वापर दाखल्यांना सहयोग करते. या मंचाची स्वीकारार्हता औद्योगिक तसेच अन्य क्षेत्रातही असल्याचे हे प्रमाण आहे.

22 हून अधिक भाषांचा समावेश – सध्या भाषिणी 22 हून जास्त भाषांमध्ये वापरता येते. याद्वारे वेगवेगळ्या भाषिक समुदायांच्या समावेशाची व्यापकता वाढली आहे.

300 पेक्षा जास्त कृत्रिम प्रज्ञा आधारित प्रारुपे – या पोर्टलवर 300 पेक्षा जास्त कृत्रिम प्रज्ञा आधारित प्रारुपे वापरता येतात. यामुळे कृत्रिम प्रज्ञा भाषा तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक पर्याय विकसित झाला आहे.

भाषिणीला मिळालेले पुरस्कार आणि प्रशंसा

भाषिणीच्या योगदानाची विविध मंचांनी प्रशंसा केली आहे. कृत्रिम प्रज्ञा, डिजिटल रुपांतरण आणि समावेशकता यामधे भाषिणी आघाडीवर असल्याचे हे प्रतीक आहे. भाषिणीला मिळालेल्या प्रशंसा आणि पुरस्कारांमध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे.

एक्सप्रेस कॉम्प्युटरचा डिजिटल ट्रेलब्लेझर पुरस्कार – भारतातील कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान

ELETS आत्मनिर्भर पुरस्कार – सरकारी विभागांच्या कृत्रिम प्रज्ञा, मशिन लर्निंग व माहिती तंत्रज्ञान उपक्रमांसाठी डिजिटल प्रशासन श्रेणीतील पुरस्कार

वर्षातील प्रभावी नेतृत्व – ग्लोबल स्पिन नवोन्मेष शिखर परिषद 2024

कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात नेतृत्व, बदल प्रवर्तक व नवोन्मेष पुरस्कार – कृत्रिम प्रज्ञा आधारित नवोन्मेष व नेतृत्व यातील सर्वोत्कृष्टतेसाठी मान्यता

कृत्रिम प्रज्ञा, माहिती विश्लेषण व अंदाज तंत्रज्ञान क्षेत्रासाठी इटी पुरस्कार – साक्षरता, भाषा व डिजिटल वर्गवारी यातील दरी सांधणारा दुवा म्हणून मान्यता

ELETS  चा शैक्षणिक नवोन्मेष पुरस्कार – कृत्रिम प्रज्ञा क्षेत्राच्या माध्यमातून सहज उपलब्ध व सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पुरस्कार

भाषिणीमागील तंत्रज्ञान

सेवा देण्यासाठी भाषिणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते:

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) अल्गोरिदम: अचूक भाषांतरे आणि अनुकूल भाषा मॉडेल वापरा.

क्लाउड-आधारित पायाभूत सुविधा: मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्यासाठीची क्षमता आणि विश्वासार्हता प्रदान करते.

सहयोगी डेटा पुलिंग: भाषा मॉडेल्समध्ये सतत सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांनी योगदान दिलेल्या खुल्या डेटासेटचा वापर.

डिजिटल इंडिया आणि भाषिणीचा दृष्टिकोन

भारताचे रुपांतर डिजिटली सक्षम समाजात आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत करण्यासाठीच्या डिजिटल इंडिया दृष्टीकोनाला भाषिणीमुळे मूर्त रूप मिळत आहे. भाषिक विविधता लक्षात घेऊन भाषिणीमुळे डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन मिळत आहे.  नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत शिक्षण, आरोग्यसेवा , प्रशासन आणि इतर आवश्यक सेवा भाषिणीमुळे अधिक चांगल्या रितीने उपलब्ध होतात.

"भाषिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी योगदानकर्ते, भागीदारी संस्था आणि नागरिकांची वैविध्यपूर्ण परिसंस्था सक्षम करण्यासाठी नैसर्गिक भाषा तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे आत्मनिर्भर भारतामध्ये डिजिटल समावेशकता आणि डिजिटल सक्षमीकरण हा भाषिणीचा दृष्टीकोन आहे. "

निष्कर्ष: भाषा सेतूद्वारे लोकसंपर्कात वृद्धी

भाषिणीमध्ये भाषिक मतभेद दूर करण्याची क्षमता आहे. महाकुंभ 2025 मध्ये भाषिणीचा वापर हे तिच्या परिवर्तन क्षमतेचे उदाहरण आहे.. अडथळाविरहीत संपर्काबरोबरच महाकुंभ उपक्रमाची समावेशकता भाषिणीमुळे वाढणार असून भारताच्या भाषा विविधतेवर उपाय म्हणून तंत्रज्ञानाच्या वापराचा आदर्श त्यामुळे घातला जाणार आहे.  खऱ्या अर्थाने जोडलेला आणि समावेशक भारताचा दृष्टिकोन समजावण्यात भाषिणीची वचनबद्ध भूमिका महत्त्वाची असल्याचं तिच्या सातत्याने होत असलेल्या वापरामुळे स्पष्ट झालं आहे.

References

https://bhashini.gov.in/

https://ddnews.gov.in/en/mahakumbh-2025-meitys-bhashini-provides-multilingual-access-in-11-languages/

https://www.instagram.com/officialdigitalindia/p/DEzjUAHBpB7/

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2092739

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2088268

https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2090895

https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1964079

https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2061675

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2039811

https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2045567

https://x.com/_BHASHINI/status/1879449310590546196

Maha Kumbh Series: 17/Explainer

Click here to download PDF


SP/Sonali/Tushar/Surekha/Prajna/PM


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2093617) Visitor Counter : 9