गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एनसीआरबी सोबत तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन


अखिल भारतीय स्तरावर सीसीटीएनएस 2.0, एनएएफआयएस, तुरुंग, न्यायालये, आयसीजेएस 2.0 सोबत अभियोजन आणि न्यायवैद्यकीय विभाग यांच्या एकत्रीकरणाच्या अंमलबजावणीचा या बैठकीत घेण्यात आला आढावा

Posted On: 24 DEC 2024 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत (NCRB) तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अखिल भारतीय स्तरावर सीसीटीएनएस 2.0, एनएएफआयएस, तुरुंग, न्यायालये, आयसीजेएस 2.0 सोबत अभियोजन आणि न्यायवैद्यकीय विभाग यांच्या एकत्रीकरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

केंद्रीय गृहसचिव, एनसीआरबीचे संचालक आणि गृह मंत्रालय, एनसीआरबी आणि एनआयसीचे अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीतील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनसीआरबीला आयसीजेएस 2.0 मध्ये नवीन फौजदारी कायद्यांची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या सुविधा करण्याचे  निर्देश दिले. ई-साक्ष, न्याय श्रुती, ई-साईन आणि ई-समन्स यांसारख्या ऍप्लिकेशन्सचा वापर प्रत्येक राज्य/ केंद्रशासित प्रदेश यामध्ये करण्यावर अमित शहा यांनी भर दिला.

तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की सर्व फौजदारी खटल्यांसाठी पूर्वनिर्धारित टप्प्यांवर आणि वेळेत नोंदणीपासून ते प्रकरण निकाली काढण्यापर्यंतचे ऍलर्ट जनरेट करावेत जेणेकरून त्यांचा लाभ पीडित आणि तक्रारदारांना मिळावा.
पूर्व-निर्धारित कालमर्यादेनुसार तपास अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऍलर्ट दिल्यास तपासाची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल. गृहमंत्रालय, एनसीआरबीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने तांत्रिक प्रकल्पांचा अवलंब वाढवण्यासाठी आणि त्यांना शक्य असेल त्या सर्व मार्गांनी मदत करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स (सीसीटीएनएस) आणि इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम (आयसीजेएस) च्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रकल्पाला चालना देण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या वरिष्ठ पोलिस यंत्रणांशी नियमित संवाद साधण्यावर देखील अमित शहा यांनी भर दिला.अनोळखी मृतदेह आणि अनोळखी व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, असे ते म्हणाले. एनसीआरबीने तपास अधिकारी आणि गुन्हेगारी न्याय प्रणालीच्या इतर हितधारकांना फायदा होण्यासाठी डेटाने परिपूर्ण मंच तयार केला पाहिजे,असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. नवीन गुन्हेगारी कायदे आणि नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम (NAFIS) च्या तांत्रिक अंमलबजावणीमध्ये एनसीआरबी च्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.


S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2087713) Visitor Counter : 18