पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतील सीबीसीआय सेंटरमध्ये 23 डिसेंबर रोजी कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी


पंतप्रधान कार्डिनल आणि बिशपसहित ख्रिस्ती समुदायातील प्रमुख नेत्यांशी साधणार संवाद

भारतातील कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात पंतप्रधान अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ

Posted On: 22 DEC 2024 2:39PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील. 

पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ची स्थापना 1944 साली झाली असून, हे भारतातील कॅथलिक समाजासोबत काम करणारी संस्था आहे. 

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2087023) Visitor Counter : 18