पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2024 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
क्वालालंपूर इथे झालेल्या 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
‘एक्स’ माध्यमावरील संदेशात ते म्हणतात,
‘क्वालालंपूर इथे झालेल्या 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाचे अभिनंदन! स्पर्धेत 55 पदके जिंकून देशाचा गौरव वृद्धींगत होईल अशी कामगिरी आपल्या गुणी खेळाडूंनी केली आहे. या स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या गौरवास्पद यशामुळे संपूर्ण देशाला, विशेषतः खेळांची अत्यंत आवड असलेल्या व्यक्तींना प्रेरणा मिळाली आहे.’
S.Kane/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2082989)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Manipuri
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Malayalam