माहिती आणि प्रसारण मंत्रालय
क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने असिफा इंडियाकडून वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार दिले जाणार
तुमच्या प्रतिभेचे दर्शन घडवाः 15 डिसेंबर 2024 पर्यंत ऍनिमेशन आणि फिल्म पुरस्कारांकरिता प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत; विजेत्यांना मिळणार संबंधित उद्योगातील अग्रणींकडून मार्गदर्शन, मान्यता आणि नेटवर्किंगच्या संधी
Posted On:
29 NOV 2024 6:13PM by PIB Mumbai
क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने एएसआयएफए, असिफा इंडिया या ऍनिमेशनला प्रोत्साहन देणाऱ्या युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक स्वयंसेवी संस्थेकडून ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि एक्सआर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करून जागतिक स्तरावर भारताच्या सर्जनशील नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार दिले जाणार आहेत.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी इच्छुकांना 15 डिसेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज पाठवता येतील आणि नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) शिखर परिषद 2025 ची सांगता या पुरस्कार सोहळ्याने होणार आहे.
वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार
सर्वोत्तम ऍनिमेशन पात्र, सर्वोत्तम दृश्य परिणाम आणि सर्वोत्तम लघुपट यांसारख्या श्रेणींमध्ये विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
विजेत्यांना उद्योगातील अग्रणींकडून मार्गदर्शन आणि नेटवर्किंगच्या संधी तसेच भारत सरकारच्या क्रिएट इन इंडियाशी संलग्न करणाऱ्या भारताच्या सर्जनशील क्रांतीचा एक भाग म्हणून मान्यता मिळेल.
आगामी वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आशय निर्मात्यांना प्रेरित करण्यासाठी भारतातील विविध शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस उत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थी आणि या क्षेत्रातील व्यावसायिकांना यामधील सहभागाकडे आकर्षित करण्यासाठी आगामी आठवड्यांमध्ये हे महोत्सव पुणे, इंदूर, नाशिक, मुंबई, नॉयडा, बंगळूरु आणि इतर अनेक भागांमध्ये आयोजित केले जातील.
यापूर्वी असिफा इंडियाने 16-17 नोव्हेंबर 2024 रोजी हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन डे चे यशस्वी आयोजन केले आणि वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आशय निर्मात्यांना प्रेरित करण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी भोपाळ मध्ये आयोजित डिझाईन फेस्टीवलमध्ये सहभाग घेतला.
हैदराबाद आयएडी 24 मध्ये उद्योगातील तज्ञांसोबत पॅनेल चर्चा
1960 मध्ये ॲनेसी, फ्रान्स येथे स्थापन झालेली आणि 24 वर्षांपासून भारतात सक्रियपणे समुदाय उभारणी करणारी असिफा ही संस्था कार्यशाळा, सीजी मीटअप आणि आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे यांसारख्या कार्यक्रमांद्वारे प्रतिभा आणि नवोन्मेषाला चालना देण्यामध्ये दिलेल्या योगदानासाठी प्रसिद्ध असून यावर्षी 15 भारतीय शहरांमध्ये तिचा विस्तार आहे.
वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार 2025 साठी अर्ज सादर करण्याची सविस्तर माहिती
शेवटची तारीखः 15 डिसेंबर 2024
सादरीकरणासाठी पोर्टलः https://filmfreeway.com/asifaiad
India Pass : india10281892
WAVES Passcode: ASIFAIADINDIA25
आगामी दिवसांमध्ये असिफा इंडियाचे आयएडी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
शहर
|
तारीख
|
बंगळूरु
|
6 डिसेंबर2024
|
मुंबई (AGIF)
|
6 आणि 7 डिसेंबर2024
|
पुणे
|
29 डिसेंबर2024
|
इंदूर
|
14 डिसेंबर 2024
|
नाशिक
|
3जानेवारी 2025
|
बिलासपूर
|
18 जानेवारी 2025
|
मोहाली
|
24 जानेवारी 2025
|
कोलकाता
|
31 जानेवारी 2025
|
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079258)
Visitor Counter : 6