आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशातील शि योमी जिल्ह्यात 186 मेगावॅटच्या टाटो-1 जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी 1750 कोटी रुपये खर्चाच्या आणि 50 महिन्यांच्या पूर्ण कालावधीच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंजुरी दिली
Posted On:
25 NOV 2024 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने अरुणाचल प्रदेशातील शि योमी जिल्ह्यात टाटो-1 जलविद्युत प्रकल्प (एचईपी) उभारण्यासाठी रु.1750 कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाजे कालावधी 50 महिने आहे.
186 मेगावॅट(3 x 62 मेगावॅट) च्या स्थापित क्षमतेच्या प्रकल्पातून 802 दशलक्ष युनिट्स (एमयु) ऊर्जा निर्मिती होईल. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज अरुणाचल प्रदेश राज्यातील वीज पुरवठ्याची स्थिती सुधारण्यास तसेच राष्ट्रीय ग्रीडचा समतोल राखण्यास मदत करेल.
भारत सरकार रस्ते, पूल आणि संबंधित पारेषण लाइनच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य म्हणून रु. 77.37 कोटी विस्तारित करेल, शिवाय पायाभूत सुविधांना सक्षम करण्यासाठी रु.120.43 कोटी केंद्रीय आर्थिक सहाय्य राज्याच्या समभाग हिश्श्यापोटी देईल.
या प्रकल्पासाठीच्या सुमारे 10 किलोमीटर रस्ते आणि पुलांच्या विकासासह पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, ज्या बहुतांश स्थानिक वापरासाठी उपलब्ध असतील. 15 कोटी रुपयांच्या समर्पित प्रकल्प निधीतून वित्तपुरवठा करण्यात येणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रुग्णालये, शाळा, आयटीआयसारख्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, बाजारपेठा, क्रीडांगणे, इत्यादींच्या उभारणीचाही जिल्ह्याला फायदा होईल. स्थानिक जनतेला अनेक प्रकारच्या भरपाई, रोजगार आणि सीएसआर क्रियाकलापांचा देखील फायदा होईल.
* * *
H.Akude/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2077300)
Visitor Counter : 7