पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी देशांतरीत भारतीय जनसमुदायाला ‘भारत को जानिये’ या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे केले आवाहन

Posted On: 23 NOV 2024 10:59AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशांतरीत भारतीय जनसमुदाय तसेच इतर देशांतील स्नेहीजनांना ‘भारत को जानिये’ (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:

“आमच्या देशांतरीत जनसमुदायाशी असलेले नाते आणखी बळकट करत आहोत !

परदेशातील भारतीय समुदाय आणि इतर देशांमधील मित्रांना #BharatKoJaniye या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचे आवाहन करतो!

bkjquiz.com ही प्रश्नमंजुषा भारत आणि जगभरात पसरलेला देशांतरीत भारतीय जनसमुदाय यांच्यादरम्यानचे नाते दृढ करते. हा उपक्रम म्हणजे आपला समृध्द वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यांचा नव्याने शोध घेण्यासाठीचा उत्तम मार्ग देखील आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना #IncredibleIndia मधील अचंबित करणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.”

 

* * *

S.Nilkanth/S.Chitnis/D.Rane


(Release ID: 2076235) Visitor Counter : 18