पंतप्रधान कार्यालय
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2024 12:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2024
झाशीची निर्भीड राणी लक्ष्मीबाई, या शौर्य आणि देशभक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप आहेत असे सांगत, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज, त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,
"झाशीची निर्भीड राणी लक्ष्मीबाई, शौर्य आणि देशभक्ती याचे खरे मूर्तिमंत स्वरूप आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी दाखविलेले शौर्य आणि परीश्रम अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. प्रतिकूल काळातसुद्धा खरा दृढनिश्चय काय असतो हे त्यांच्या नेतृत्वाने आपल्याला दाखवून दिले.”
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2074544)
आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam