गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे दोन दिवसीय 'दहशतवाद विरोधी परिषद-2024' च्या उद्घाटन सत्राला केले संबोधित
युएपीए प्रकरणांमध्ये एनआयए ला सुमारे 95% दोष सिद्धी दर प्राप्त करण्यात मिळाले यश
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2024 7:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे (एनआयए ) आयोजित दोन दिवसीय 'दहशतवाद विरोधी परिषद-2024' च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनआयएच्या बोधवाक्याचे अनावरण केले, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए) च्या तपासासाठी मानक संचालन प्रक्रिया जारी केली तसेच एनआयएच्या 11 पदक विजेत्यांचा सत्कार केला.

यावेळी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन,गुप्तचर विभागाचे संचालक तपन कुमार डेका, उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंकज सिंह आणि एनआयएचे महासंचालक सदानंद वसंत दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, दहशतवादविरोधी मुद्यांवर काम करणाऱ्या केंद्रीय संस्था/विभागांचे अधिकारी आणि कायदा, न्यायवैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान यांसारख्या संबंधित क्षेत्रातील तज्ञ उपस्थित आहेत.


अमित शहा यांनी नमूद केले की 2 ऑगस्ट 2019 रोजी एनआयए कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, ज्यामध्ये नवीन गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि एनआयएला अतिरिक्त अधिकार देण्यात आले ज्यामुळे ते परदेशातही तपास करू शकतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, एनआयए ने युएपीए अंतर्गत प्रकरणांचा तपास केला आहे आणि जवळपास 95% दोषसिद्धी दर प्राप्त करण्यात यश मिळवले आहे.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2071589)
आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam