राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्या आशियाई बौद्ध शिखर परिषदेत घेतला सहभाग

Posted On: 05 NOV 2024 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 नोव्हेंबर 2024) नवी दिल्ली येथे,आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या पहिल्या आशियाई बौद्ध शिखर परिषदेत सहभाग घेतला.

भारत ही धर्माची पवित्र भूमी आहे, असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या.भारतामध्ये प्रत्येक युगात, महान गुरु आणि गूढवादी, द्रष्टे आणि साधक होऊन गेले आहेत ज्यांनी मानवतेला अंतरंगात शांतता आणि बाहेर  सर्वांशी सुसंवाद शोधण्याचा मार्ग दाखवला आहे. या मार्ग शोधणाऱ्यांमध्ये बुद्धाचे अनन्यसाधारण स्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.बोधगया येथील बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमांना झालेली दिव्यज्ञानप्राप्ती ही इतिहासात अतुलनीय घटना आहे.त्यांनी केवळ मानवी मनाच्या कार्याबद्दल अतुलनीय समृद्ध अंतर्दृष्टी प्राप्त केली नाही, तर त्यांनी "बहुजन सुखाय बहुजन हिताय च" या उक्तीप्रमाणे हे ज्ञान जनसामान्यांच्या कल्याणासाठी सर्व लोकांसोबत सामायिक करणे देखील निवडले, असेही त्या म्हणाल्या.

जग आज अनेक आघाड्यांवर अस्तित्त्वाच्या संकटाचा सामना करत आहे,केवळ मानवी संघर्षच नाही तर हवामानाच्या संकटाचाही सामना करत आहे,अशा काळात बौद्ध समुदायाकडे मानवजातीला देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, असे त्यांनी सांगितले. संकुचित सांप्रदायिकतेचा मुकाबला कसा करायचा हे बौद्ध धम्माच्या विविध विचारधारा जगाला दाखवतात,यांचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला.या सर्व विचारधारांचा मध्यवर्ती संदेश शांतता आणि अहिंसेवर केंद्रित आहे, असे त्यांनी सांगितले.  जर एका शब्दात बुद्ध धम्माचे  सार सांगायचे असेल तर ते म्हणजे ‘करुणा’ किंवा दया , ज्याची आज जगाला गरज आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

आशिया खंडाला बळकट करण्यासाठी बुद्ध धर्माच्या भूमिकेवर चर्चा करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. खरे तर, बुद्ध धर्म आशिया खंडात आणि जगामध्ये शांतता, खरी शांती कशी आणू शकतो, हे पाहण्यासाठी आपल्याला यावर विस्ताराने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. खरी शांती म्हणजे केवळ शारीरिक हिंसाच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोभ आणि द्वेषापासून मुक्त शांतता.बुद्धांच्या मते आपल्या सर्व दुःखांचे मूळ कारण लोभ आणि द्वेष या दोन मानसिक उर्जाच आहेत, असे त्यांनी सांगितले. बुद्धाच्या शिकवणीतून तयार झालेल्या आपल्या सामायिक वारशाच्या आधारे ही शिखर परिषद आपले सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्यासाठी भविष्याकडे वाटचाल करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2070854) Visitor Counter : 37