पंतप्रधान कार्यालय
भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2024 11:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :
“डॉ. बिबेक देबरॉय जी हे एक महान विद्वान होते, जे अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. आपल्या कामातून त्यांनी भारताच्या बौद्धिक परिक्षेत्रावर अमीट छाप सोडली आहे. सार्वजनिक धोरणातील त्यांच्या योगदाना बरोबरच, आपल्या प्राचीन ग्रंथांवर काम करण्यात आणि हे ग्रंथ युवा वर्गाला सहजतेने उपलब्ध करून देण्यात आनंद मिळवला.”
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2070059)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam