गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘एकता दौड’ ला झेंडा दाखवून केले रवाना
Posted On:
29 OCT 2024 11:54AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता दौड’ ला झेंडा दाखवून रवाना केले. राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचा भाग म्हणून या ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या संबोधनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये महान नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशाने एकता आणि एकात्मतेचा संकल्प करावा यासाठी ‘एकता दौड’ चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून संपूर्ण देश, अखंड देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा केवळ संकल्पच करत नाही तर भारतमातेच्या सेवेसाठी स्वतःला पुन्हा समर्पित देखील करत आहे.
***
SonalT/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069145)
Visitor Counter : 33