पंतप्रधान कार्यालय
भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आयटीबीपी हिमवीरांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2024 3:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तिबेट सीमा पोलीसदलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान लिहितात :
"आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हे दल शौर्य आणि समर्पण यांचं महान प्रतिक आहे. अतिशय दुर्गम प्रदेश आणि प्रतिकूल वातावरणात हे हिमवीर आपलं रक्षण करतात. याव्यतिरिक्त, नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्य दरम्यान त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत. . @ITBP_official"
S.Kane/S. Mhaskar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2067677)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam