पंतप्रधान कार्यालय
राजस्थानच्या धौलपूरमधील रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची घोषणा
Posted On:
20 OCT 2024 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या धौलपूर येथे रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति शोक व्यक्त केला. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्यरत आहे असे ते म्हणाले.
एक्स वरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले:
"राजस्थानच्या धौलपूरमध्ये झालेला अपघात हृदयविदारक आहे. या अपघातात निरपराध मुलांसह प्राण गमावलेल्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच मी सर्व जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांची सर्वतोपरी मदत करत आहे: पंतप्रधान."
मोदी यांनी धौलपूर, राजस्थान येथील या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पीएमएनआरएफ (पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जातील असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले:
"पंतप्रधानांनी धौलपूर, राजस्थान येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये दिले जातील."
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066496)
Visitor Counter : 39
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam