पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्तीला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी भारत मंडपम मधील अनुभूती केंद्राला दिली भेट


भारताच्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रवासाला चालना देण्यात पीएम गतिशक्तीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहेः पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 13 OCT 2024 9:44PM by PIB Mumbai

 

पीएम गतिशक्तीला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम मधील अनुभूती केंद्राला भेट दिली. भारताच्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रवासाला चालना देण्यात पीएम गतिशक्तीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

आज गतिशक्तीला तीन वर्षे पूर्ण होत असताना भारत मंडपम आणि अनुभूती केंद्राला भेट दिली, जिथे या उपक्रमाच्या परिवर्तनकारी शक्तीची अनुभूती झाली.”

भारताच्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रवासाला चालना देण्यात पीएम गतिशक्तीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि कोणत्याही संभाव्य आव्हानाला तोंड देता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने केला जात आहे.”

***

S.Kane/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2064567) आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam