पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

घोषणा आणि करारांची सूची- मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईझ्झू यांचा भारत दौरा (06 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024)

Posted On: 07 OCT 2024 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2024

 

अनुक्रमांक

घोषणा

1.

भारत आणि मालदीव्ज: व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठीच्या दृष्टिकोनाबाबत सहमती

2.

भारतीय सरकारतर्फे हुरावी या मालदीवच्या तटरक्षक जहाजाची विनामूल्य दुरुस्ती

 

सुरुवात/उद्घाटन/हस्तांतरण

1.

मालदीवमध्ये रूपेकार्डची सुरुवात

2.

हानिमाधू  आंतरराष्ट्रीय विमानतळ (एचआयए) परिसरातील नव्या धावपट्टीचे उद्घाटन

3.

एक्झिम बँकेच्या खरेदीदार कर्ज सुविधेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 700 हून अधिक सामाजिक निवासांचे हस्तांतरण

 

सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या/ नुतनीकरण

मालदीव देशाचे प्रतिनिधी

भारतीय बाजूचे प्रतिनिधी

1.

चलन विनिमय करार

मालदीव चलन प्राधिकरणाचे गव्हर्नर अहमद मुनावर

केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग सचिव अजय सेठ

2.

भारतातील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आणि मालदीवचे राष्ट्रीय धोरणे आणि कायदा अंमलबजावणी महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य करार

मालदीवचे भारतातील उच्चायुक्त इब्राहीम शाहीब

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातील सीमा व्यवस्थापन विभाग सचिव डॉ.राजेंद्र कुमार

3.

भ्रष्टाचार प्रतिबंध आणि भ्रष्ट्राचार विरोधी लढ्यासाठी द्विपक्षीय सहकार्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि मालदीवचा भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोग यांच्यातील सामंजस्य करार

मालदीवचे भारतासाठीचे उच्चायुक्त इब्राहीम शाहीब

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातील सीमा व्यवस्थापन विभाग सचिव डॉ.राजेंद्र कुमार

4.

भारतीय राष्ट्रीय न्यायिक  अकादमी (एनजेएआय) आणि मालदीव येथील न्यायिक सेवा आयोग (जेएससी) यांच्यात मालदीवच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमतानिर्मिती कार्यक्रमांसंदर्भातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

मालदीवचे भारतातील उच्चायुक्त इब्राहीम शाहीब

भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त मुनू महावर

5.

क्रीडा आणि युवा व्यवहार यांतील सहकार्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण

मालदीवचे भारतातील उच्चायुक्त इब्राहीम शाहीब

भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त मुनू महावर

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2062922) Visitor Counter : 55