मंत्रिमंडळ
देशातील प्रमुख बंदरे आणि गोदी कामगार मंडळ कर्मचारी/कामगार यांच्यासाठी वर्ष 2020-21 ते वर्ष 2025-26 या कालावधीत सुधारित उत्पादकतेशी संलग्न मोबदला (पीएलआर) राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2024 10:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देशातील प्रमुख बंदरे आणि गोदी कामगार मंडळ कर्मचारी/कामगार यांच्यासाठी वर्ष 2020-21 ते वर्ष 2025-26 या कालावधीत सुधारित उत्पादकतेशी संलग्न मोबदला (पीएलआर) राबवायला मंजुरी दिली आहे.
वर्ष 2020-21 ते वर्ष 2025-26 या कालावधीत राबवण्यात येणार असलेली ही सुधारित पीएलआर योजना देशातील प्रमुख बंदर प्राधिकरणांमध्ये आणि गोदी कामगार मंडळात कार्यरत सुमारे 20,704 कर्मचारी/कामगार यांच्यासाठी लाभदायक ठरेल.या संपूर्ण कालावधीत सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 200 कोटी रुपयांची आवश्यकता भासेल.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने वर्ष 2020-21 ते वर्ष 2025-26 या कालावधीसाठी सर्व प्रमुख बंदर प्राधिकरणे तसेच गोदी कामगार मंडळ कर्मचारी/कामगार यांच्यासाठी उत्पादकतेशी संलग्न मोबदला (पीएलआर)योजनेत सुधारणा केली असून पीएलआरचा हिशोब करताना अखिल भारतीय पातळीवरील कामगिरीपेक्षा बंदर निहाय कामगिरीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. उत्पादकतेशी संलग्न मोबदल्याचा (पीएलआर) हिशोब करताना दर महिन्याला 7,000 रुपयांच्या बोनससाठी वेतन मर्यादेनुसार हिशोब केला जाईल.बंदर निहाय कामगिरीला असलेले महत्त्व 50% वरुन वाढवून आधी 55% आणि त्यानंतर 60% इतके वाढवून वार्षिक तत्वावर पीएलआर चुकता केला जाईल. वर्ष 2025-26 पर्यंत अखिल भारतीय बंदर कामगिरीला देण्यात येणारे महत्त्व 40% पर्यंत कमी करण्यात येईल. अखिल भारतीय बंदर कामगिरी आणि बंदर निहाय कामगिरी यांना सध्या असलेले 50%चे महत्त्व या नव्या हिशोबामुळे बदलेल. या प्रस्तावित सुधारणा देशातील प्रमुख बंदरांमध्ये निकोप स्पर्धेसह कार्यक्षमतेला चालना देतील.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2061790)
आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam