पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

'मेक इन इंडिया’ उपक्रम 140 कोटी भारतीयांच्या सामुहिक निर्धाराचे दर्शन घडवतो: पंतप्रधान


गेल्या दशकभरात या चळवळीला यश मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांची केली प्रशंसा

Posted On: 25 SEP 2024 11:33AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अंमलबजावणीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम देशाला उत्पादन आणि नवोन्मेष यांचे सशक्त केंद्र म्हणून घडवण्यासाठी 140 कोटी भारतीयांनी केलेल्या सामुहिक निर्धाराचे दर्शन घडवतो ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ‘मेक इन इंडिया’ला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“आज आपण ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या चळवळीला यश मिळवून देण्यासाठी गेल्या दशकभरात अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम आपल्या देशाला उत्पादन आणि नवोन्मेष यांचे सशक्त केंद्र म्हणून घडवण्यासाठी 140 कोटी भारतीयांनी केलेल्या सामुहिक निर्धाराचे दर्शन घडवतो. देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये निर्यातीचे प्रमाण कशा प्रकारे वाढले आहे, नव्या क्षमता निर्माण झाल्या आणि त्यायोगे आपली अर्थव्यवस्था सशक्त झाली आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे.

‘मेक इन इंडिया’ला सर्व मार्गांनी प्रोत्साहन देण्याप्रती सरकार कटिबद्ध आहे. सुधारणांच्या बाबतीत भारताची आगेकूच देखील अशीच सुरु राहील. आपण सर्वजण एकत्रितपणे आत्मनिर्भर आणि विकसित भारताची उभारणी करू!”

***

Sonalt/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058552) Visitor Counter : 32