पंतप्रधान कार्यालय
‘समिट ऑफ द फ्युचर’ परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
23 SEP 2024 11:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्युयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘समिट ऑफ द फ्युचर’ परिषदेत उपस्थितांना संबोधित केले.
‘अधिक उज्ज्वल भविष्यासाठी बहुस्तरीय उपाययोजना’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक पातळीवरील नेत्यांनी या परिषदेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
याप्रसंगी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी, आगामी पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारताने निश्चित केलेली संकल्पना ठळकपणे मांडली. जागतिक शांतता, विकास आणि समृद्धी यांची कास धरणाऱ्या आणि जगातील एक षष्ठांश लोकसंख्या असलेल्या देशाच्या वतीने आपण या परिषदेला संबोधित करत आहोत असे पंतप्रधानांनी नमूद केले. जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु असलेल्या आपल्या सामुहिक प्रयत्नांमध्ये मानव-केंद्रित दृष्टीकोनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी शाश्वत विकास विषयक उपक्रमांचे प्रमाण वाढवण्यात भारताला मिळालेले यश अधोरेखित केले. तसेच, याच अनुषंगाने प्रयत्न करत भारताने गेल्या दशकात अडीचशे दशलक्ष लोकांना दारिद्यरेषेच्या बाहेर काढले असल्याची बाब नमूद केली. जगाच्या दक्षिणेकडील देशांसोबत ऐक्याची भावना व्यक्त करत त्यांनी सांगितले की भारताला आपले विकासविषयक अनुभव त्या देशांशी सामायिक करण्याचा विशेष मान मिळाला. अधिक उत्तम सार्वजनिक कल्याणासाठी देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची माहिती सामायिक करण्याचा मार्ग भारताने खुला ठेवला असल्याची माहिती देत पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या सुरक्षित तसेच जबाबदार वापराला प्रोत्साहन देण्यासाठी संतुलित नियम निर्माण करण्याचे आवाहन केले. यासाठीचे मार्गदर्शक तत्व म्हणून पंतप्रधानांनी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्वाप्रती भारताची वचनबद्धता अधोरेखित केली.
सुधारणा ही समर्पकतेसाठीची गुरुकिल्ली असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी यावेळी, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह जागतिक प्रशासनातील संस्थांमध्ये तातडीने सुधारणा घडवण्याचे आवाहन केले. जागतिक कृती ही जागतिक महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असली पाहिजे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा. https://bit.ly/4diBR08
जागतिक डिजिटल संक्षिप्त मसुदा आणि भविष्यकालीन पिढ्यांसंदर्भातील जाहीरनामा या दोन परिशिष्टांसह ‘अ पॅक्ट फॉर द फ्युचर’ नामक कराराच्या परिणामी दस्तऐवजाचा स्वीकार करून सदर परिषद संपन्न झाली.
* * *
JPS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058208)
Visitor Counter : 57
Read this release in:
Telugu
,
Manipuri
,
Bengali
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil