पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेतल्या शिकागो येथे केलेल्या भाषणाला 132 वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंदांचे केले स्मरण
Posted On:
11 SEP 2024 11:06AM by PIB Mumbai
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या शिकागो, येथे 1893 मध्ये दिलेले प्रसिद्ध भाषण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.
श्री मोदी म्हणाले की, विवेकानंदांनी भारताचा एकता, शांतता आणि बंधुतेचा दिलेला प्राचीन संदेश अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आजच्याच दिवशी 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये त्यांचे प्रसिद्ध भाषण दिले होते. त्यांनी भारताचा एकता, शांतता आणि बंधुतेचा प्राचीन संदेश जगासमोर मांडला. त्यांचे शब्द आम्हाला ऐक्य आणि समरसतेच्या शक्तीची पिढ्यानपिढ्या सतत प्रेरणा देत आहेत."
***
NM/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053667)
अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam