पंतप्रधान कार्यालय
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
06 SEP 2024 5:22PM by PIB Mumbai
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण कुमारच्या जिद्द आणि दृढ निर्धार या गुणांचेही कौतुक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"#पॅरालिम्पिक 2024 मध्ये नवीन शिखर गाठल्याबद्दल आणि पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचे अभिनंदन!
त्याच्या जिद्द आणि दृढ निर्धार यामुळे आपल्या देशाला हा गौरव लाभला आहे.
भारताला त्याचा अभिमान आहे!
#Cheer4Bharat"
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2052625)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam