पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पॅरा तिरंदाज हरविंदर सिंगचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
04 SEP 2024 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पॅरा तिरंदाज हरविंदर सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
मोदी यांनी हरविंदर सिंगची अचूकता, एकाग्रता आणि अविचल वृत्ती अधोरेखित करत त्याच्या असाधारण कामगिरीचे कौतुक केले.
एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"पॅरा तिरंदाजीत एक अतिशय खास सुवर्ण !
#Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हरविंदर सिंगचे अभिनंदन!
अचूकता, एकाग्रता आणि अविचल वृत्ती उत्कृष्ट आहे. त्याच्या या कामगिरीचा भारताला खूप आनंद झाला आहे.
#Cheer4Bharat”
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2052158)
Visitor Counter : 43
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam