गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत, भारत सरकार, त्रिपुरा सरकार आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्या प्रतिनिधींमध्ये उद्या नवी दिल्लीत होणार सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2024 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2024
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्या बुधवार, 04 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारत सरकार, त्रिपुरा सरकार आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्या प्रतिनिधींमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. या सामंजस्य करारावरील स्वाक्षरी प्रसंगी त्रिपुराचे मुख्यमंत्री, प्रा. (डॉ.) माणिक साहा आणि गृह मंत्रालय आणि त्रिपुरा सरकारचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
अतिरेकी कारवाया, हिंसाचार आणि संघर्षांपासून मुक्त असा विकसित ईशान्य प्रदेश घडवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकारण्यासाठी गृह मंत्रालय अथक परिश्रम करत आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकारने ईशान्येत शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या 12 महत्त्वपूर्ण करारांपैकी 3 त्रिपुरा राज्याशी संबंधित आहेत. मोदी सरकारने अनेक करारांवर स्वाक्षरी केल्यामुळे सुमारे 10 हजार जण हिंसेचा मार्ग त्यागून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051457)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada