पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू थुलासीमती मुरुगेसनचे केले अभिनंदन

Posted On: 02 SEP 2024 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2024

 

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात आज रौप्य पदक जिंकल्याबद्दल थुलासीमती मुरुगेसन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"#Paralympics2024 मध्ये थुलासिमतीने महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात  रौप्य पदक जिंकणे हा खूप अभिमानाचा क्षण! तिचे यश अनेक तरुणांना प्रेरित करेल. खेळाप्रती तिचे समर्पण प्रशंसनीय आहे. तिचे अभिनंदन.

@Thulasimathi11

#Cheer4Bharat"

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051087) Visitor Counter : 48