पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव इथे लखपती दिदींसोबत साधलेल्या संवादाचे शब्दांकन
Posted On:
26 AUG 2024 1:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान: ज्या लखपती दीदी बनल्या आहेत आणि ज्या नाहीयेत, त्यांच्यात काय संवाद असतो?
लखपती दीदी: – ज्या लखपती दीदी बनतात तेव्हा त्यांची घरची परिस्थिती आणि त्यांचे अनुभव त्यांना वेगळे दिसतात आणि त्या स्वावलंबी होतात. त्यामुळे त्या आपल्या कुटुंबाचा खर्च उत्तम प्रकारे सांभाळतात. आणि सर दोन दिव्यांग दिदी आहेत. त्यांनाही पाठबळ दिले आहे. सर्वप्रथम, त्यांना पाहून मलाही खूप आनंद होतो.
पंतप्रधान: त्या दिव्यांग भगिनीही झाल्या लखपती दीदी?
लखपती दीदी - होय, अगदी! त्यांना लखपती बनवले.
पंतप्रधान: त्या काय काम करतात?
लखपती दीदी: एकीचा दोना पत्तलचा व्यवसाय आहे, तर दुसरीचे किराणा दुकान आहे. मी स्वतः लखपती सीआरपी आहे. मी साडेतीन ते चार लाख रुपये कमावते आणि माझ्या बहिणींनाही मी लखपती बनवले आहे.
लखपती दीदी: मी तर लखपती आहेच. मी नुकतेच दोन 260 महिला लखपती बनवल्या आहेत.
पंतप्रधान: तुम्ही लखपती दीदी बनलात, याचा अर्थ तुम्ही वर्षभरात किती कमावता?
लखपती दीदी: मी एका वर्षात आठ लाख रुपये कमावते.
पंतप्रधान: आठ लाख रुपये?
लखपती दीदी: होय सर.
पंतप्रधान: हे तर तुमच्या दुप्पट आहे. किती वर्षांत तुम्ही हे साध्य केले?
लखपती दीदी: सर मला आता पाच वर्षे झाली आहेत.
पंतप्रधान: संपूर्ण आसाममधील लोक तुमच्याकडे एक मोठी प्रेरणा म्हणून पाहत असतील.
लखपती दीदी: हो बघूया. आता सर, मी झिरो वरुन हिरो झाली आहे सर.
पंतप्रधान: शाब्बास!
लखपती दीदी: माझ्या सखी मंडळाचे नाव आहे – अतिउत्तम सखी मंडळ. ज्यामध्ये आम्ही हाताने बनवलेले आणि घरगुती बनवलेली सौंदर्य उत्पादने बनवतो. जी सर्व घरातील वस्तूंपासूनच बनवली जातात. सरस मेळावा, व्हायब्रंट गुजरात, मान्सून महोत्सव आहे. या सर्वांनी आम्हाला इतके चांगले व्यासपीठ दिले ज्यामुळे आमच्या उत्पादनाची लोकप्रियता खूप वाढली आहे. एका वर्षात आम्ही 30 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल केली आहे.
पंतप्रधान: 30 लाख रुपयांची!
लखपती दिदी: 30 लाख रुपयांच्या वर उलाढाल आणि 12 लाखाच्याही वर आमचा निव्वळ नफा आहे सर!
लखपती दिदी: 10 महिला मिळून सॅनिटरी नॅपकीनची कंपनी चालवतो सर!
पंतप्रधान: लातूर पासून किती लांब आहे आपला गाव?
लखपती दिदी: 20 किलोमीटर आहे सर!
पंतप्रधान: 20 किलोमीटर! जेव्हा सुरु केले होते, तेव्हा किती भगिनी होत्या?
लखपती दीदी: तेव्हा 10 भगिनी होत्या. कोणी यायला तयार नव्हते आणि हे सॅनिटरी नॅपकिन्स आमच्यासाठी लाजिरवाणे आहेत हे सांगायलाही त्या तयार नव्हत्या. त्या म्हणायच्या की आम्ही हे सांगू शकत नाही.
पंतप्रधान: किती उलाढाल होते?
लखपति दीदी: 5 लाखांची उलाढाल होते सर!
पंतप्रधान: तुम्ही एवढं छान हिंदी कसं काय बोलता?
लखपति दीदी: अशीच येते सर….. बोलून बोलून!
पंतप्रधान: अच्छा, तर विक्री साठी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाता का?
लखपती दीदी: नाही नाही सर, सध्या तरी महाराष्ट्रातच विक्री करतो. मी तुमचे खूप खूप आभार मानते कारण महिलांसाठी जो सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यात आला आणि आम्हाला जो रोजगार मिळाला सर, त्यात महत्त्वाची भूमिका तुमचीच आहे. आम्ही तर फक्त माध्यम आहोत. हे सगळं, हा मार्ग तुम्हीच आखून दिला आहे. आम्हाला तर त्यावरुन फक्त चालायचे आहे.
लखपति दीदी: 2017 पासून मी बॅंक सखी म्हणून काम केले.
पंतप्रधान: आता किती कमावता?
लखपति दीदी: आता मी सर….साडे चार ते पांच लाखांपर्यंत कमावते.
पंतप्रधान: तुम्ही इथल्याच आहात?
लखपति दीदी: हो.
पंतप्रधान: तर मग या सगळ्यांना घरी घेऊन जा.
लखपति दीदी: घेऊन जाईन सर, तुम्ही पण या.
पंतप्रधान: हां, मला कोण बोलावतं, कोणी बोलवता नाहीं.
लखपती दीदी: मी तज्ञ आहे सर, माझे काम असे आहे. ज्या महिला आहेत, ग्रामीण महिला आहेत, ज्यांना बँकेत जाण्यात अडचण येते, ज्यांच्या घरी समस्या आहेत. मी त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची बॅंकेत खाती उघडते.
लखपती दीदी: सर, मी तुम्हाला कालचे उदाहरण सांगते. सर, काल माझ्या बाहुलीला (मुलीला) शाळेत विचारलं की तिची आई कुठे गेली?
पंतप्रधान: अच्छा!
लखपती दीदी: तर सर, माझ्या मुलीने मोठ्या अभिमानाने सांगितले की माझी आई महाराष्ट्रात गेली आहे आणि मोदीजींना भेटायला गेली आहे. तर सर, तुम्ही नहानला आला होता. त्यावेळी सुद्धा मला तुम्हाला भेटायला मिळालं नाही पण सर आज तुम्हाला भेटून खूप बरं वाटतंय, हे आमचे भाग्य आहे सर!
पंतप्रधान: मी पूर्वी सिरमौरला खूपदा यायचो!
लखपती दीदी: 2023 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष सुरु होते, तेव्हा आम्ही भरडधान्याचे प्रशिक्षण घेतले, सर. भरडधान्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक जिल्हा पंचायत आहे, तिथे आम्हाला भरडधान्य कॅफे चालवण्यासाठी इमारत मिळाली. तर आम्ही 38 दिदी तिथे काम करतो.
पंतप्रधान: तुम्ही किती कमावता?
लखपती दीदी: मी सर, माझा पगार तिथे 30 हजार रुपये आहे. त्यामुळे माझे वार्षिक उत्पन्न 3 लाख 30 हजार रुपये आहे.
लखपती दीदी: मी एक पशु सखी आहे आणि गुजरातच्या NDD च्या वतीनं मदत कार्यकर्ता देखील आहे आणि मी स्वतः लखपती दीदी आहे आणि माझ्यासोबत 88 महिला काम करतात.
लखपती दीदी: माझ्या गटाचे नाव जय माता दी आहे. आणि मी पाथरी गावात पशुसखी म्हणून काम करते आणि 500 शेतकऱ्यांसोबत काम करते.
पंतप्रधान: 500
लखपति दीदी: 500 शेतकऱ्यां सोबत!
लखपती दीदी: तर माझं काम असं आहे की, ज्या SAG दीदी आहेत, त्यांना मी कर्ज मिळवून देते, आणि त्यांना पुढची वाटचाल करण्यात मदत करते. मी वर्षाला जवळपास 1 लाख 50 दीड हजार रुपये कमावते.
प्रधानमंत्री: दीड लाख
लखपती दीदी: हो सर.
पंतप्रधान: व्वा.
लखपती दीदी: आम्ही अमिडियन आहोत सर, त्यामुळे आम्हाला आमच्या समाजातून, बाहेर जाण्याची परवानगी नव्हती सर. माझ्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती सर, आणि गटासोबत जोडून घेतल्यानंतर मला पथरी या पशु संखींच्या गावात काम मिळालं. आणि आज मी स्वतः लखपती दीदी आहे सर.
पंतप्रधान: तुम्ही कुठून आला आहात?
लखपती दीदी: मेघालयातून.
पंतप्रधान: मेघालय, तुमच्यासोबत किती बहिणी आहेत?
लखपती दीदी: एका गटामध्ये आम्ही 10 जणी आहोत.
पंतप्रधान: 10 आहेत.
लखपती दीदी: पण आम्ही तर SHG pharmacy मध्ये इतकं काम करत आहोत, मी तर आत्ताच SHG pharmacy तीन लाख, तीन हजार स्थापित केले आहेत.
लखपती दीदी: जेव्हा आम्ही या मोहिमेत सहभागी झालेलो नव्हतो, तेव्हा आमचे काहीच महत्त्व नव्हते. जेव्हा आम्ही या मोहिमेत सहभागी झालो तेव्हा आमचा सन्मान वाढला. जेव्हा शेतीचे डॉक्टर झालो, आणि कृषी सखीचे प्रशिक्षण मिळाले तेव्हा.
लखपती दीदी: आम्हाला डॉक्टर दीदी म्हणून ओळखले जाते.
पंतप्रधान: किती पशुधन आहे, ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते?
लखपती दीदी: सर, आमच्याकडे जे काही आहे, आमचा ब्लॉक (कामाचं क्षेत्र) खूप मोठा आहे. तर तिथे आम्ही सर्वजणी मिळून 20 जणी काम करत आहोत. तर आमच्या इथे 470 लखपती दिदी घडवल्या आहेत आम्ही.
पीएम: 470?
लखपती दीदी: हो
पंतप्रधान: व्वा, तुम्ही तर कमाल करून दाखवलीत. तुमचे खूप खूप अभिनंदन.
लखपती दीदी: सर, तुम्ही 2021 मध्ये 10,000 शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याची योजना आखली होती. त्याच अंतर्गत सर, आम्ही आत्मनिर्भर महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड इच्छावर, स्थापना केली सर. आणि सर, पहिल्याच वर्षी आम्ही 1000 शेतकरी भगिनींना कंपनी सोबत जोडून घेऊन.
पंतप्रधान: एक हजार ?
लखपती दीदी: हो सर.
पंतप्रधान: एका वर्षात ?
लखपती दीदी: हो सर.
लखपती दीदी: अदाब सर, माझं नाव राबिया बशीर आहे. मी जम्मू – काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातली आहे. माझा डेअरी फार्मचा व्यवसाय आहे. आणि आता माझं वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार आहे. मी स्वत: एक लखपती आहे, आणि मी माझ्यासोबत 160 सदस्यांना लखपती बनवले आहेत.
पंतप्रधान: तुम्ही किती पशु धनाची काळजी घेता?
लखपती दीदी: आम्ही सध्या 10 पशु धनाची काळजी घेत आहोत.
लखपती दीदी: जय जोहर सर, जय छत्तीसगड.
पंतप्रधान: जय जोहर .
लखपती दीदी: सर आमचा एफपीओ आहे, सोन्यासंबंधीचा भारत सरकारने जो प्रकल्प आखला आहे. आणि त्या सोबत आत्तापर्यंत आमच्या पंधरा हजार आठशे भगिनी जोडल्या गेल्या आहेत - शेतकरी भगिनी. तर प्रत्येक दिदी 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत स्वतःचे कमिशन कमावते.
पंतप्रधान: किती भगिनी आहेत?
लखपती दीदी: सध्या आमच्यासोबत 100, पाचशे महिला आहेत.
पंतप्रधान: अच्छा.
लखपती दीदी: मी ड्रोन दीदी आहे.
पंतप्रधान: ड्रोन दीदी आहात. मग तुम्हाला गावातले सगळेजण ड्रोन पायलट म्हणत असतील.
लखपती दीदी: हो, त्या जिल्ह्यात 3 ड्रोन पायलट आहेत, त्यात मी पण आहे.
लखपती दीदी: 2019 पासून मी SHG जीवन स्वयं सहायताची सदस्य आहे. सर, आमच्यासोबत 1500 महिला.
पीएम: 1500?
लखपती दीदी: हो सर. मला मराठी हिंदी फारशी येत नाही सर,.
पंतप्रधान: तुम्ही मराठीत बोलू शकता?
लखपती दीदी: माझ्या शेतात मोहाची झाडं आहेत. मी मोहाचा व्यवसाय करते आणि गटामध्ये ज्या महिला आहेत, त्यांच्याकडूनही मी मोह विकत घेते. दोन महिन्यात मला दोन - अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले.
पंतप्रधान: दोन लाख?
लखपती दीदी: हो
पंतप्रधान: आणि एकूण किती महिला आहेत? पाचशे?
लखपती दीदी: पाचशे अडतीस.
लखपती दीदी: सर, मी मराठीत बोलते आहे.
पंतप्रधान: हा, चालेल.
लखपती दीदी: माझा पर्यटनाचा व्यवसाय आहे. माझ्याकडे दोन टुरिस्ट बोटी आहेत. या बोटींमधून मी पर्यटकांना घेऊन जाते. मी स्वतः केरळला गेले होते, तिथे मी त्यांचा व्यवसाय पाहिला. इथे आम्ही महिलाच हा व्यवसाय करतो. माझी स्वत:ची टूरिस्ट बोट मी गेल्या तीन वर्षांपासून चालवते आहे. त्यातून मला वर्षाला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
प्रधानमंत्री: व्वा!
लखपती दीदी: आम्ही सर्व महिला एकत्र मिळून हा व्यवसाय आणखी पुढे नेणार आहोत.
लखपती दीदी: मी गोंदिया जिल्ह्यातून आहे. सालेकसा या आदिवासी भागातली आहे, मी आदिवासी महिला आहे, आणि मला ई - रिक्षा मिळाली आहे, आणि मी स्वत: ई - रिक्षा चालवते आणि त्यातूनच मी गावातूनही खरेदी करते. 10 ते 12 हजार रुपये महिन्याचा नफा मला मिळतो.
पंतप्रधान: तुम्हा सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर मला वाटते की, आता देशात लखपती दीदींची संख्या खूप वाढणार आहे. आणि जेव्हा लोक तुम्हाला पाहतील, तुमच्या कथा ऐकतील, तुम्ही सुद्धा इथल्या बाकीच्यांनाही सांगा की तुम्हाला काय अनुभव आला आहे, अनुभव कसा होता आणि त्यामुळे तुम्ही किती आत्मनिर्भर होऊ शकता, आणि संपूर्ण कुटुंबाला किती मदत करू शकता. इतकंच नाही तर तुमच्या शक्तीचा उपयोग होतो आणि त्यामुळे तुमच्या आजू बाजूचे जे सर्व वातावरण आहे, त्यात एक मोठ्या प्रमाणात चांगला बदल घडून येतो. ठाऊक आहे का की, माझं ध्येय काय आहे? बघा, 1 कोटी दीदी लखपती दीदी बनल्या आहेत आणि मला 3 कोटी लखपती दीदी घडवाच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला इतरांनाही समजावून सांगावे लागेल. करणार ना?
लखपती दीदी: हो सर
पंतप्रधान : नक्की.
लखपती दीदी: हो
पंतप्रधान: शाब्बास. धन्यवाद.
***
SonalT/AshutoshS/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049275)
Visitor Counter : 55
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada