पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशाला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2024 9:39AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रसार माध्यम ‘एक्स’ वर सामायिक केलेल्या संदेशात पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला.
“पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. अंतराळ क्षेत्रातील आपल्या देशाच्या कामगिरीचे आम्ही अभिमानाने स्मरण करतो. आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या योगदानाचे कौतुक करण्याचाही आजचा दिवस आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अंतराळ क्षेत्राच्या प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की, "आमच्या सरकारने या क्षेत्राशी संबंधित दूरदृष्टीने अनेक भविष्यवेधी निर्णय घेतले आहेत आणि आगामी काळात या क्षेत्रामध्ये आम्ही आणखी खूप काही करू शकणार आहोत ."
***
JPS/SB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047987)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam